नाशिक- नाशिकच्या पंचवटी परिसरातील रामकुंड भागातील वस्त्रांतर गृहातील पूजेच्या साहित्याची चोरी झाली होती. याचा पोलिसांनी उलगडा केला आहे. यात दोन जणांकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या संशयितांकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
मंदिराच्या साहित्यांची चोरी करणारे दोघे गजाआड; मुद्देमाल हस्तगत - nashik crime news
पंचवटी परिसरातील रामकुंड भागातील वस्त्रांतर गृहातील लॉकर तोडून चोरट्यांनी चांदीच्या समई, तांब्याचे ताट, चांदीचा पाठ, चांदीच्या लहान मोठ्या गाई, तांब्याचे ताट अशा पद्धतीचे साहित्य चोरले होते. याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

robbery-in-temple-police-arrested-two-accused-in-nashik
हेही वाचा-...तर घरगुती सिलिंडर १०० ते १५० रुपयांनी महागणार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरातील रामकुंड भागातील वस्त्रांतर गृहातील लॉकर तोडून चोरट्यांनी चांदीच्या समई, तांब्याचे ताट, चांदीचा पाठ, चांदीच्या लहान मोठ्या गाई, तांब्याचे ताट असे साहित्य चोरले होते. पंचवटी पोलिसांनी या घटनेचा तपास करून दोघांना अटक केली. समाधान वाघ, नाना शेवरे असे आरोपीचे नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीतील साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.