नाशिक - पंचवटीतील शिंदे मळा परिसरात गुरुवारी पहाटे घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेशकरून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम, असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला.
पंचवटी परिसरात घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास - नाशिक क्राईम न्यूज
पंचवटी परिसरात मोरे मळ्या लगत शिंदे मळा आहे. या ठिकाणी जनार्दन लक्ष्मण शिंदे यांचे कुटुंब वास्तव्याला आहे. गुरुवारी पहाटे शिंदे कुटुंबातील सदस्य झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरामागे असलेल्या गाई- म्हशीच्या गोठ्यातून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले २० तोळे सोन्याचे व ५ तोळे चांदीचे दागिने आणि ४५ हजार रुपयांची रोख रक्कम, असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला.

पंचवटी परिसरात मोरे मळ्या लगत शिंदे मळा आहे. या ठिकाणी जनार्दन लक्ष्मण शिंदे यांचे कुटुंब वास्तव्याला आहे. गुरुवारी पहाटे शिंदे कुटुंबातील सदस्य झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरामागे असलेल्या गाई- म्हशीच्या गोठ्यातून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले २० तोळे सोन्याचे व ५ तोळे चांदीचे दागिने आणि ४५ हजार रुपयांची रोख रक्कम, असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. शिंदे कुटुंबातील सदस्य नेहेमीप्रमाणे उठले असता घरातील कपाट उघडे व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी तत्काळ पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
शिंदे कुटुंबीयांचा मूळ व्यवसाय हा शेती असून त्याला जोडधंदा म्हणून ते दुग्धव्यवसाय देखील करतात. त्यांच्या बंगल्याला लागूनच गायींचा गोठा आहे. यातील एक गाय ही गरोदर असून तीची केव्हाही प्रसूती होऊ शकते. यामुळेच बंगल्याला लागून असलेल्या गोठ्याचा दरवाजा त्यांनी उघडा ठेवला होता. याच मार्गाने चोरट्यांनी बंगल्यात घुसून चोरी केली.