नाशिक -काही दिवसांपूर्वी मुथूट फायनान्सवर दरोडा घालण्यात आला होता. यात दरोडेखोरांशी दोन हात करणाऱ्या आयटी अभियंत्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी काही दिवसातच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. या पार्श्वभूमीवर कंपनीने पोलिसांचा सन्मान केला आहे. आयुक्त विश्वास नांगरे-पाटील याच्याकडे ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.
नाशकातील मुथूट फायनान्स दरोड्यातील दरोडेखोर जेरबंद; ५ लाखांचा धनादेश देऊन पोलिसांचा सन्मान - commissioner vishwas nagare nashik
काही दिवसांपूर्वी मुथूट फायनांसवर दरोडा घालण्यात आला होता. यात दरोडेखोरांशी दोन हात करणाऱ्या आयटी अभियंत्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांना दरोडेखोरांना अटक करण्यात यश आले. कंपनीकडून यशाबद्दला पोलिसांचा सन्मानाचा कार्यक्रम घेण्यात आला. आयुक्त विश्वास नांगरे याच्याकडे ५ लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.
दरोडेखोरांशी दोनहात करणाऱ्या आयटी इंजिनीअर असलेल्या ब्रेव्ह हार्ट सॅज्यु सॅम्युअल या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. दरोडेखोरांनी सॅज्यु यांच्यावर ५ गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. सॅज्यु सॅम्युअलने दाखवलेल्या धाडसामुळे मुथूट फायनान्सचे करोडो रुपयांचे सोने नेण्यास दरोडेखोरांना अपयश आले होते. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून सीसीटीव्हीच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमधून दरोडेखोरांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि मेहनतीमुळे परराज्यात जाऊन कुख्यात गुंडाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मुथूट फायनान्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सन्मान करत पोलीस वेलफेअरसाठी ५ लाखांचा धनादेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच ब्रेव्ह हार्ट सॅज्यु सॅम्युअल यांच्या धाडसाचा सन्मान म्हणून त्यांच्या पत्नीला मुथूट फायनान्सच्या सेवेत रुजू करण्यात आले आहे. तसेच कुटुंबासाठी ३५ लाख ठेवी बँकेत ठेवण्यात आल्याचे मुथुट फायनान्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.