महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संचारबंदी काळात नानावली भागात चोरी करणाऱ्यास अटक - nashik police action

संचारबंदी काळात नाशिक शहरात चोरी झाल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. यात 21 एप्रिलला शहरातील तिगरिया नगर परिसरातील नानावली भागात असलेल्या माजिद बालम शेख यांच्या गोडाऊनचे पत्रे उचकटून गोडाऊनमधील साहित्य चोरी केल्याची घटना घडली होती.

nashik police
संचारबंदी काळात नानावली भागातील गोडाऊनचे पत्र उचकवून चोरी करणाऱ्यास अटक

By

Published : Jun 12, 2020, 2:06 PM IST

नाशिक - संचारबंदी काळात नाशिक शहरातील तिगारिया नगर भागात असलेल्या नानावली परिसर काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. गोडाऊनचे पत्रे उचकटून घरगुती वापराचे प्रेशर कुकर आणि ताडपत्री लांबवणाऱ्या संशयित चोरट्यास भद्रकाली पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. संदीप दशरथ जाधव, असे चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संचारबंदी काळात नाशिक शहरात चोरी झाल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. यात 21 एप्रिलला शहरातील तिगरिया नगर परिसरातील नानावली भागात असलेल्या माजिद बालम शेख यांच्या गोडाऊनचे पत्रे उचकटून गोडाऊनमध्ये असलेले घरगुती वापराचे प्रेशर कुकर आणि ताडपत्री चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, याबाबत माजिद शेख यांनी भद्रकाली पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

भद्रकाली पोलिसांनी गुन्हे शोध पथकाच्या सहाय्याने या याप्रकरणी तपास सुरू केला. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी संदीप जाधव यांना शहरातील बागबानपुरा भागातून अटक केली. दरम्यान, पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून 66 हजारांच्या मुद्देमाल देखील जप्त केला आहे. याबाबत नाशिकचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी अधिक माहिती दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details