नाशिक- निफाड-नाशिक रस्त्यावरून वरून नांदगावच्या दिशेने युरिया घेऊन जाणारा ट्रक खड्डा वाचविताना सिंगापूर पुलावरून खाली कोसळला. यात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.
निफाड-नाशिक रस्त्यावर अपघात, एक ठार - accident
निफाड नाशिक रस्त्यावर एका ट्रकला अपघात झाला असून यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. पुलावरील खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला. सार्वजनिक बांधकाम विभाग यावर दुर्लक्ष करत असून येथील खड्डे तात्काळ दुरूस्त करावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

कादवा नदीवरील सिंगापूर पुलावरून युरिया खताचा ट्रक (एमएच 15 केजी 7820) नांदगावकडे जात होता. पुलावरील खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात दहा टन युरियाने भरलेल्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने पुलाच्या खाली शंभर फूट कोसळला. अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. ट्रकमध्ये चालकासह चार प्रवासी होते. या अपघातात ट्रकचालक दशरथ उत्तम सांगळे (वय-27, रा. बेळगाव, ता. नांदगाव) यांचा मृत्यू झाला. तर विलास केंद्रे, सुका गवळी, उत्तम माळी, ताराबाई माळी यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर निफाड येथील जनसेवा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.