नाशिक - जिल्ह्यातील मालेगावातील अख्तराबाद भागातील रिक्षा चालकाने लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केली. नसीर वजीर शेख (वय 50), असे त्यांचे नाव असून जिल्ह्यात कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीचा हा पहिला बळी आहे.
मालेगावात रिक्षा चालकाची आत्महत्या, जिल्ह्यात बेरोजगारीचा पहिला बळी - नाशिक लेटेस्ट न्यूज
देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आता अनलॉक -१ मध्ये काही प्रमाणात व्यवसाय सुरू झाले. मात्र, सर्वाजनिक वाहतूक व्यवस्था आणि रिक्षा व्यवसाय अद्यापही बंद आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आता अनलॉक -१ मध्ये काही प्रमाणात व्यवसाय सुरू झाले. मात्र, सर्वाजनिक वाहतूक व्यवस्था आणि रिक्षा व्यवसाय अद्यापही बंद आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामधून मालेगाव येथील रिक्षा चालक नसीर वजीर शेख यांनी बेरोजगारीमुळे आपले जीवन संपवले. नसीर यांना लॉकडाऊन काळात रिक्षा व्यतिरिक्त दुसरे रोजगारीचे साधन नसून त्यांच्यावर कुटुंबातील सात जणांचा उदरनिर्वाहाची जबाबदारी होती. मात्र, लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा? असा प्रश्न त्यांना पडला होता. याच मानसिकतेमधून त्यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली, असे सामाजिक कार्यकर्ते शफीक अहमद यांनी सांगितले.
याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नसीर यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, दोन मुले, असा परिवार आहे.