महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aaditya Thackeray : बंडखोरांचा खरा चेहरा उघड; राजीनामा देवून एकदा निवडणुकीला सामोरे जा - आदित्य ठाकरे - आदित्य ठाकरे याची बंडखोर आमदारांवर टीका

आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) शिवसंवाद दौऱ्यानिमित्त ( Shiv Samvad Yatra ) येवला येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांशी संवाद साधला. जे 40 आमदार, 12  खासदार तिकडे गेले ( Rebel MLA ) असून मी त्यांना सांगतोय की, राहायचं तिथे रहा आनंदात रहा. परंतू राजीनामा देवून एकदा निवडणुकीला सामोरे जा. राज्यातील जनता प्रत्येकाला त्यांची जागा ( Aditya Thackeray criticizes rebel MLA) दाखवून देईल असे ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray
आदित्य ठाकरे

By

Published : Jul 22, 2022, 5:34 PM IST

येवला ( नाशिक ) -शिवसेनेचे युवा सेना प्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) शिवसंवाद दौऱ्यानिमित्त ( Shiv Samvad Yatra ) येवला येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांशी संवाद साधला. जे 40 आमदार, 12 खासदार तिकडे गेले ( Rebel MLA ) असून मी त्यांना सांगतोय की, राहायचं तिथे रहा आनंदात रहा. परंतू राजीनामा देवून एकदा निवडणुकीला सामोरे जा. राज्यातील जनता प्रत्येकाला त्यांची जागा ( Aditya Thackeray criticizes rebel MLA) दाखवून देईल असे ठाकरे म्हणाले.

शिवसंवाद यात्रा

हेही वाचा -Mission 200 Incomplete : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मुख्यमंत्र्यांचे मिशन 200 अपूर्ण, चंद्रकांत पाटलांचाही दावा ठरला फोल

आमच्याबद्दलचा द्वेष बाहेर यायला लागला..आतापर्यंत जे बोलायचे आम्हाला उद्धव ठाकरे बद्दल आदर आहे, ठाकरे परिवाराबद्दल आदर आहे, शिवसेनेबद्दल आदर आहे, आता त्यांचा खरा चेहरा समोर येतो आहे. ठाकरे बद्दल त्यांच्या मनातील किती आदर आहे ते पळपुट्या आमदारांनी दाखवून दिल्याची टीका त्यांनी केली.

दरम्यान,औरंगावाद जिल्ह्यातील सेनेचे पाचपैकी चार आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर आता शिवसेनेतर्फे मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यासोबत पक्षश्रेष्ठींसह नेतेमंडळी बैठक घेऊन पुढील रूपरेषा आखत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात बैठकांचे बैठक घेण्यात येणार आहे.

आदित्य ठाकरे दाखवणार ताकद?- औरंगाबाद जिल्ह्यातील पश्चिम मतदार संघाचे संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) , पैठण मतदारसंघाचे संदिपान भुमरे ( Sandipan Bhumre of Paithan Constituency ) , मध्य मतदारसंघाचे प्रदीप जैस्वाल ( Pradeep Jaiswal ) तर वैजापूरचे रमेश बोरनारे ( Ramesh Bornare of Vaijapur ) हे आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. आता याच मतदारसंघांमध्ये आदित्य ठाकरे शिवसेनेची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. शुक्रवारी वैजापूर येथे दुपारच्या सुमारास शिवसैनिकांचा मेळावा आयोजित ( Vaijapur shivsena ) करण्यात आला आहे. तर पश्चिम आणि मध्य या मतदारसंघांसाठी शुक्रवारी सायंकाळी संत एकनाथ रंगमंदिर येथे मेळाव्याचा आयोजन करण्यात आला आहे. त्यापूर्वी जालना रोड येथे आदित्य ठाकरे रोड शो करून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. एकंदरीतच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांमध्ये त्यांच्या शिवाय देखील शिवसेनेची ताकद आहे आणि त्यानंतरही राहील असा संदेश आदित्य ठाकरे या निमित्ताने देणार आहेत.

यांच्या विरोधात आदित्य ठाकरे घेणार मेळावे...आमदार संदिपान भुमरे हे तीन वेळा शिवसेनेच्या पक्षचिनावर आमदार म्हणून निवडून आले. मंत्री झाल्यामुळे मिळालेली संधी ही फक्त शिवसेनेमुळे मिळाली होती. अशा पद्धतीने गेल्या काही दिवसात शिवसेना नेत्यांनी टीका केली आहे. एका कारखान्यात सुरक्षारक्षक म्हणून असलेल्या संदिपान भुमरे यांना शिवसेनेमुळे राजकारणात प्रवेश मिळाला. ते आमदार आणि मंत्री होऊ शकले.

सलग तीन वेळा आमदार संजय शिरसाट-संजय शिरसाट हे पश्चिम मतदार संघाचे आमदार असून आधी ते रिक्षा चालक होते. 1990 च्या सुमारास ते शिवसेनेत आले. त्यानंतर नगरसेवक आणि त्यानंतर सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. औरंगाबाद मध्ये प्रदीप जयस्वाल 1988 नंतर सलग सेनेच्या वतीने निवडणूक जिंकत आले. पहिले नगरसेवक, सेनेचे पहिले महापौर खासदार आणि नंतर आमदार अशी संधी त्यांना शिवसेनेमुळे मिळाली. मात्र यावेळी त्यांनी शिंदे गटासोबत जाणं पसंत केलं. त्यामुळे मूळ असलेला शिवसैनिक त्यांच्यावर नाराज झाला आहे.


वैजापूर शिवसेनेचा बालेकिल्ला-वैजापूर तसा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा. माजी आमदार आर एम वाणी हे तिथे प्रबळ दावेदार होते. मात्र, यावेळेस पहिल्यांदाच रमेश बोरणारे यांना उमेदवारी देण्यात आली. ते निवडूनही आले. मात्र, त्यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने वैजापूर मतदारसंघात त्यांच्या विरोधात शिवसेनेने रान पेटवत आपला मतदारसंघ बांधून ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

हेही वाचा -Droupadi Murmu Become President : द्रौपदी मुर्मू विजयी, मोदी-शाह जोडी पुन्हा हीट, एनडीएच्या बाहेरचीही मते मिळाली

ABOUT THE AUTHOR

...view details