महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकचे महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव - महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण जाहीर

महापौरपदासाठी भाजपमधील शशिकांत जाधव, उद्धव निमसे, दिनकर पाटील यांनी कंबर कसली असून याबाबत तातडीने अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. याशिवाय शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकही तयारीला लागले असून महापौर निवडीच्या रिंगणात कोण उतरणार याकडे आता सर्व नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; नाशिकचे महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी

By

Published : Nov 13, 2019, 8:14 PM IST

नाशिक - राज्यातील विविध महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीच्या आरक्षणाची बुधवारी सोडत झाली. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककरांचे या सोडतीकडे लक्ष लागून राहिले होते. नाशिक महानगरपालिकेत सर्वसाधारण गटातील खुल्या प्रवर्गासाठी महापौर पदाचे आरक्षण असणार आहे. त्यामुळे अनेक नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; नाशिकचे महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी

महापौरपदासाठी भाजपमधील शशिकांत जाधव, उद्धव निमसे, दिनकर पाटील यांनी कंबर कसली असून याबाबत तातडीने अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. याशिवाय शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकही तयारीला लागले असून महापौर निवडीच्या रिंगणात कोण उतरणार याकडे आता सर्व नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - २७ महापालिकेसाठी महापौर आरक्षण जाहीर, १६ शहरांमध्ये खुल्या वर्गातील महापौर

एकीकडे राज्याचा सत्तासंघर्ष सुरू असताना आता दुसरीकडे नाशिकमध्ये देखील महापौर पदावरून रस्सीखेच सुरू होणार आहे. नुकतीच महापौर पदासाठीच्या आरक्षणाची सोडत झाली असून सर्वसाधारण गटातील खुल्या प्रवर्गासाठी ही सोडत जाहीर झाली आहे. महापौरपदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता अनेक नगरसेवकांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. विद्यमान महापौर रंजना भानसी यांना कार्यकाळ वाढवून दिल्याने १५ डिसेंबर पर्यंत त्यांच्याकडे महपौर पदाची सूत्रे असणार आहे. त्यामुळे आता नवे महापौर कोण होणार याबाबत सर्वच पक्षातील नगरसेवकांनी तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा - 'बाजार समित्या बरखास्तीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या गळ्यात फास'

महापौर पदासाठी भाजपमधून शशिकांत जाधव, दिनकर पाटील, उद्धव निमसे हे प्रमुख दावेदार आहेत. तर शिवसेनेकडून सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, विलास शिंदे हे दावेदार असून मनसेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत दिसणार आहे.

नाशिक महानगरपालिकेतील आजवरच्या महापौरांची कारकीर्द आणि आरक्षण

महापौर कालावधी आरक्षण :-
- वसंत गिते १९९७-१९९८ नागरिकांचा मागासवर्ग
- अशोक दिवे १९९८-१९९९ अनुसूचित जाती
- डॉ. शोभा बच्छाव १९९९-२००२ महिला राखीव सर्वसाधारण
- दशरथ पाटील २००२-२००५ सर्वसाधारण
- बाळासाहेब सानप २००५-२००७ नागरिकांचा मागासवर्ग
- विनायक पांडे २००७-२००९ सर्वसाधारण
- नयना घोलप २००९-२०१२ अनुसूचित जाती
- ॲड. यतीन वाघ २०१२-२०१४ सर्वसाधारण
- अशोक मुर्तडक २०१४-२०१७ नागरिकांचा मागासवर्ग
- रंजना भानसी २०१७-२०१९ अनुसूचित जमाती
(१९९२ ते १९९७ पर्यंत आरक्षण ही पद्धत नव्हती)

महापौर पदासाठी आरक्षण सोडत झाल्यानंतर आता अनेक मातब्बर महापौर पद मिळवण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहे. लवकरच महापौर पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार हे स्पष्ट होणार आहे. राज्यातील सत्तास्थापनेचा घोळ अजूनही कायम असल्याने त्यावर पुढील गणिते अवलंबून असणार आहेत. भाजप आणि सेनेत सध्या तणाव असल्याने महापौर पदाची निवडणूक अत्यंत चुरशी होणार हेही तितकेच खरे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details