नाशिक- सद्या होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. युती आणि आघाडी यांची अजूनही जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे. त्यामुळे हे पक्ष स्वतंत्र लढणार का? युतीत लढणार हे जरी स्पष्ट झाले नसेल तरी राज्यात काही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे. त्यात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने ही स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा स्वबळाचा नारा; राज्यात 25 जागेवर उमेदवार देणार - रिपब्लिकन पक्ष बातमी
राज्यात 25 जागांवर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपले उमेदवार देणार आहे. त्यापैकी 14 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आलेत. मागील काळात या पक्षाने आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आघाडीत फक्त आश्वासने मिळाली कोणतीही कामे झाली नाही.
हेही वाचा-केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र; पाटील, तावडेंसह पंकजा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून आऊट?
राज्यात 25 जागांवर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपले उमेदवार देणार आहे. त्यापैकी 14 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आलेत. मागील काळात या पक्षाने आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आघाडीत फक्त आश्वासने मिळाली कोणतीही काम झाली नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा विचार या पक्षाने घेतला आहे. नाशिकमध्ये पश्चिम मतदारसंघ आणि देवळाली मतदारसंघात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष निवडणूक लढणार आहे. यावेळी निवडणुकीत पक्षाची ताकद विरोधकांना दाखवून देऊ, असा इशारा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने दिला आहे. त्यामुळे युती आणि आघाडीतील उमेदवारांन समोर पुन्हा एक नवीन आव्हान उभे राहणार आहे.