नाशिक- श्रीरामजन्मोत्सवानिमित्त नाशिकचे प्रसिद्ध श्री काळाराम मंदिर उजळून निघाले आहे. वासंतिक नवरात्र महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांनी भाविक मंत्रमुग्ध होत आहेत.
रामजन्मोत्सवानिमित्त काळाराम मंदिर उजळले, धार्मिक कार्यक्रमांनी भाविक मंत्रमुग्ध - धार्मिक कार्यक्रम
नाशिकच्या काळाराम मंदिरात सध्या वासंतिक नवरात्र महोत्सव सुरू आहे. हा महोत्सव ६ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. त्यात नृत्य, संगीत अथंग आवली, अवघा रंग एक झाला, गीत रामायण, राम रतन धन पायो, अभंगवाणी, नृत्यभक्ती, रंग, स्वरधारा, भरतनाट्यम, भक्ती संध्या हे कार्यक्रम विविध कलाकार सादर करत आहे. तर शनिवार १३ एप्रिल रोजी श्रीराम नवमी जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.

प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. या नाशिकमध्ये रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिर हे अत्यंत पुरातन मंदिर असून ते अनेकांचे श्रद्धास्थान आहे. सध्या या मंदिर परिसरात वासंतिक नवरात्र महोत्सव सुरू आहे. यानिमित्ताने विवेक केळकर आणि संजय अडावदकर यांनी गीत रामायण सादर केले. 'राम जन्मला, गं बाई राम जन्मला' या गीताने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
हा वासंतिक नवरात्र महोत्सव ६ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. त्यात नृत्य, संगीत अथंग आवली, अवघा रंग एक झाला, गीत रामायण, राम रतन धन पायो, अभंगवाणी, नृत्यभक्ती, रंग, स्वरधारा, भरतनाट्यम, भक्ती संध्या हे कार्यक्रम विविध कलाकार सादर करत आहे. दरम्यान, शनिवार १३ एप्रिल रोजी श्रीराम नवमी जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.