नाशिक :कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आलेख खालावल्याने नाशिक जिल्ह्याला रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे उद्यापासून (दि. १ जून) लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवेची दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
जिल्ह्यात दुपारी ३ ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लावण्यात आली असून, विनाकारण बाहेर पडल्यास ५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. यासोबतच, उद्योग सुरु करण्यासही परवानगी देण्यात आल्याने जिल्ह्याचे अर्थचक्र वेगाने फिरण्यास मदत होणार आहे. मात्र शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर उद्योगांसाठी लाॅकडाऊन कायम राहणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
नाशकात लाॅकडाऊन शिथिल; ७ ते २ वाजेपर्यंत दुकाने राहणार सुरू जिल्ह्यातील निर्बंध अखेर १ जूनपासून काही प्रमाणात शिथिल..
जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा फैलाव नियंत्रणात आला आहे. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातील निर्बंध अखेर १ जूनपासून काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवांच्या दुकानांसह अन्य काही सेवांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच, दुकानांच्या वेळेतही वाढ करण्यात आली आहे.
अशी आहे नियमावली..
- अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत राहणार सुरु.
- सार्वजनिक ठिकाणी दुपारी ३ ते पहाटे ६ पर्यंत फिरण्यास मनाई.
- गर्दी टाळण्यासाठी भाजीबाजार राहणार बंद.
- दूध विक्रीसाठी पूर्वीसारखीच सवलत.
- रेशन दुकाने शासकीय वेळेनुसार सुरू राहतील.
- शिवभोजन थाळीचा लाभही सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत पार्सल स्वरूपात घेता येईल.
- हॉटेल्स, फूड मॉल, अन्य खाद्यपदार्थांची दुकाने आणि मद्य विक्री पार्सल स्वरूपात उपलब्ध.
- अंत्यविधीसाठी २० लोकांची मर्यादा, त्यानंतरच्या विधींसाठी १५ लोकांच्या उपस्थितीची मर्यादा.
- शासकीय कार्यालयांमध्ये २५ टक्के उपस्थिती राहणार.
- कृषीविषयक साहित्याची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरु राहतील.
- सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ, सोहळे यांवर बंदी कायम.
- लग्न केवळ रजिस्टर पद्धतीने ५ लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी.
- क्रीडांगण, उद्याने, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृह, चित्रपटगृह बंदच राहणार.
- खासगी क्लासेस, शाळा केवळ ऑनलाईन सुरू राहतील.
- अत्यावश्यक सेवेतील वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीला विक्रीला परवानगी.
- अत्यावश्यक सेवा वगळता शनिवारी आणि रविवार लॉकडाऊन कायम राहणार.
- बँक, पोस्ट कार्यालये सकाळी १० ते दुपारी २ या वेळात खुली राहणार.
- सलून, पार्लर पुरेशी काळजी घेत सुरू करण्यास मान्यता.
हेही वाचा :मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्लूएसच्या 10 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार, राज्य सरकारचा आदेश