महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणुकीतील जाचक अटी शिथील करा ; स्वाभिमानीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथिल करावी, यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी भेट घेतली.

Reduce Inspection Terms about gram panchayat election
ग्रामपंचायत निवडणूकीतील अटी कमी करण्यासाठी स्वाभिमानीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

By

Published : Mar 10, 2020, 1:21 PM IST

नाशिक -जिल्ह्यात होणाऱ्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी भेट घेतली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी आपल्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत, त्यांना ग्रामपंचायत निवडणूकीतील जाचक अटी शिथील करण्याची विनंती केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीतील जाचक अटी शिथील करा ; स्वाभिमानीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

हेही वाचा...शॅडो मंत्रिमंडळ : मनसेच्या नव्या भूमिकेला जनतेचा कसा प्रतिसाद?

ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथिल करावी. अटी शिथिल होत नसल्यास तीन दिवसांत जात वैधता प्रमाणपत्र देण्याची सुट देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणी संदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

ग्रामपंचायत निवडणुकीतील अटी कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे संदीप जगताप यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष साहेबराव मोरे, राकेश शिंदे, सचिन कड, संजय थोरात, संतोष गायकवाड, भरत पेलमहाले, सागर बोराडे, बाळासाहेब निसाळ, योगेश नाठे, वैभव जगताप आदी अनेक सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा...महाराष्ट्रातील दोघांना कोरोना विषाणूची लागण, देशभरात एकूण ४७ रुग्ण..

ABOUT THE AUTHOR

...view details