महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा भरणार, आरोग्य मंत्री राजेश टोपेंची माहिती - maharashtra health department

पब्लिक हेल्थमधील १७ हजार, मेडिकल एज्युकेशन १२ हजार, पालिका स्तरावर ११ हजार अशा ४० हजार जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे
आरोग्य मंत्री राजेश टोपे

By

Published : May 14, 2020, 9:24 AM IST

Updated : May 14, 2020, 2:03 PM IST

नाशिक- राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य विभाग या संदर्भात सतर्क झाला आहे. मात्र आरोग्य विभागातील अनेक कर्मचारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्याचा विचार राज्य सरकारने केला आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे

मेगाभारतीसाठी केलेल्या पात्र अर्जधारकांना गुणांच्या आधारावर ही भरती केली जाणार आहे. यात पब्लिक हेल्थमधील १७ हजार, मेडिकल एज्युकेशन १२ हजार, पालिका स्तरावर ११ हजार अशा ४० हजार जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व जागा गेल्या सरकारच्या काळातील आहेत आणि सद्याची परिस्थिती बघून हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या या लढाईसाठी पहिल्या फळीत लढणारे हे डॉक्टर, नर्स तसेच इतर आरोग्य कर्मचारी आहेत. त्यामुळे ही पदे भरली जाणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Last Updated : May 14, 2020, 2:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details