नाशिक - कर्नाटकमधील बेळगाव येथे असलेल्या मणगुत्ती ग्रामपंचायतीच्या ठरावाने छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात तो हटवल्याने सर्वत्र या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
'शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी लाठी-काठी खाण्याची माझी तयारी आहे' - मणगुत्ती छत्रपती शिवाजी महाराज पुतळा
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संपूर्ण देशाला आदर आहे. सर्वच पक्षांना आदर आहे. परंतु, असे असूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर पुतळा काढण्याची आवश्यकता काय होती, असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.
‘बेळगाव जिल्हयातील मणगुत्ती गावामध्ये सर्वांचेच आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जाणीवपूर्वक व सूडबुद्धीने रातोरात हटवण्यात आल्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो. कर्नाटक सरकारने संबंधितांवर कडक कारवाई करून तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करावी. अन्यथा, महाराष्ट्रच्या जनतेसह स्वतः बेळगावात जाऊन लाठ्या-काठ्या खाण्यास आम्ही तयार आहोत,’ असा इशारा राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. त्यांनी हा पुतळा लवकरात लवकर पुनर्स्थापित करावा, अशी मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संपूर्ण देशाला आदर आहे. सर्वच पक्षांना आदर आहे. परंतु, असे असूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर पुतळा काढण्याची आवश्यकता काय होती, असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.
‘महाराष्ट्राच्या विरुद्ध असलेली असूया हे एकच कारण यामागे आहे. महाराज हे संपूर्ण देशाचे होते. या देशामध्ये राज्य क्रांती महाराजांनी घडवून आणली. पुतळा बसवण्यासाठी लाठी काठी खाण्याची माझी तयारी आहे,’ असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.