महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक : मालेगावात रॅपिड अ‌ॅक्शन फोर्स दाखल, रमजान ईदची नमाज घरीच पठन करण्याचे आवाहन - नाशिकमध्ये शीघ्र कृती दलाचे जवान दाखल बातमी

रमजान ईद काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मालेगांवात शीघ्र कृती दलाचे जवान दाखल झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरीच अदा करुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन ध्वनिक्षेपकाद्वारे पथसंचलन दरम्यान करण्यात आले.

नमाज घरीच पठन करण्याचे आवाहन
नमाज घरीच पठन करण्याचे आवाहन

By

Published : May 24, 2020, 12:29 PM IST

Updated : May 24, 2020, 3:17 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात कोरोनाचे सावट असताना रमजान ईदही याच सावटाखाली साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर रमजान ईदची सामूदायिक नमाज ईदगाह मैदानावर पठण करू द्यावी, अशी मागणी मुस्लीम राजकीय नेते व धर्मगुरूंनी करण्यात आली आहे. त्यामुळे रमजान ईद काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मालेगावात शीघ्र कृती दलाचे जवान दाखल झाले आहेत.

रनजान ईदच्या पार्श्वभूमीवर मालेगावात रॅपिड अ‌ॅक्शन फोर्स दाखल

मालेगावातील पूर्व व पश्चिम भागात पोलिसांनी शीघ्र कृती दलासह शनिवारी सशस्त्र पथ संचलन करून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरीच अदा करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन ध्वनिक्षेपकाद्वारे पथसंचलन दरम्यान करण्यात आले. या संचलनात पोलीस महापरिक्षेत्र निरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे आदींनी संचलनाचे नेतृत्व केले. कोरोना व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर या संचलनास विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

संचलनात १ हजार ८०० पोलीस अधिकारी व कर्मचारी असा फौजफाटा सहभागी

पोलीस अधीक्षक - २ , अप्पर पोलीस अधीक्षक - २, पोलीस उपअधीक्षक - ५, पोलीस निरीक्षक - २२, दुय्यम अधिकारी - ८३ , पोलीस कर्मचारी - १ हजार ५८, आर.सी.पी प्लाटून - ०३, ईन्फोर्समेंट स्कॉड - ३ , केंद्रीय राखीव पोलीस दलाची १ शीघ्र कृती दल कंपनी, होमगार्ड - ३४ व राज्य राखीव पोलीस दलाच्या ६ कंपन्या असा सुमारे १ हजार ८०० पोलीस अधिकारी व कर्मचारी असा फौजफाटा या संचलनात सहभागी आहे.

Last Updated : May 24, 2020, 3:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details