महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकच्या प्राचीन श्री काळाराम मंदिरात राम जन्मोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी - kalaram mandir

श्री काळाराम मंदिर हे हेमाडपंथी बांधकाम असलेलं प्राचिन मंदिर आहे. प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता मातेची प्राचीन मूर्तीदेखील येथे आहे. मंदिर प्रशासनाकडून गुढीपाडव्या पासून वासंतिक नवरात्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रसिध्द कलाकार येऊन विविध धार्मिक कार्यक्रम सादर करतात.

नाशिकच्या प्राचीन श्री काळाराम मंदिरात राम जन्मोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी

By

Published : Apr 13, 2019, 2:40 PM IST

नाशिक -प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकमध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. येथील श्री काळाराम मंदिरात लाखो भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. हे मंदिर येथील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देशभरातील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.
आज (१३ एप्रिल) दुपारी ठीक १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडला. ढोल ताशांच्या गजरात आणि 'जय श्री रामा'च्या जय घोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. दिवसभर येथे धार्मिक सोहळे पार पाडत आहेत.

नाशिकच्या प्राचीन श्री काळाराम मंदिरात राम जन्मोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी
श्री काळाराम मंदिर हे हेमाडपंथी बांधकाम असलेलं प्राचिन मंदिर आहे. प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता मातेची प्राचीन मूर्तीदेखील येथे आहे. मंदिर प्रशासनाकडून गुढीपाडव्या पासून वासंतिक नवरात्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रसिध्द कलाकार येऊन विविध धार्मिक कार्यक्रम सादर करतात. गीतरामायण, अभंगवाणी, भरत नाट्यम, स्वरधारा, भक्ती संध्या, असे विविध कार्यक्रम येथे पार पडत आहेत. येत्या 16 एप्रिल रोजी एकादशीच्या दिवशी रामरथ आणि गरुड रथ यात्रा सालाबादप्रमाणे निघणार आहेत. ह्या सोहळ्याला देखील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

ABOUT THE AUTHOR

...view details