महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नाईट लाईफमुळे महिला-मुलींची सुरक्षितता धोक्यात येईल, आमचा विरोध' - रामदास आठवले मुंबई नाईट लाईफ

मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू करण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मात्र, आता त्याची अंमलबजावणी करू नये, असे रामदास आठवले यांनी म्हटले.

ramdas athvale on mumbai night life
रामदास आठवले

By

Published : Jan 22, 2020, 7:35 PM IST

Updated : Jan 22, 2020, 7:48 PM IST

नाशिक -मुंबईतील नाईट लाईफला आमचा विरोध आहे. नाईट लाईफमुळे गुन्हेगारांचे फावेल आणि महिला-मुलींची सुरक्षितता धोक्यात येईल. नाईट लाईफबद्दल आदित्य ठाकरेंच्या मताशी मी सहमत नाही. महामार्गावर ढाबे सुरू असणे ठीक आहे. मात्र, शहरात नको. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करू नये, असेही रामदास आठवले म्हणाले. सामाजिक न्याय व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाशिक विभागातील मागील पाच वर्षांच्या विविध योजनांच्या सद्यस्थितीबाबत त्यांनी आढावा घेतला. आठवलेंच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे बैठक पार पडली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

'नाईट लाईफमुळे महिला-मुलींची सुरक्षितता धोक्यात येईल, आमचा विरोध'

शरद पवारांनी फक्त मतांसाठी इंदू मिलला भेट दिली -
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदू मिलला भेट दिली असली तरी राष्ट्रवादीला आमची मते मिळणार नाही. सर्व काही फक्त मतांसाठी होत आहे, अशी टीका आठवलेंनी केली. जोपर्यंत मी मोदींसोबत आहे तोपर्यंत आमची मते कोणालाही मिळणार नाहीत. तसेच इंदूमिलमधील बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच त्या स्मारकाचे नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन व्हावे ही आमची मागणी असल्याचे आठवले म्हणाले. तसेच वाडिया रुग्णालयाला निधी द्यायला आमचा विरोध नाही. मात्र, स्मारकाचा पैसा देऊ नये. इतर निधी द्यावा, असेही ते म्हणाले.

सीएए देशातील मुस्लीम बांधव अन् नागरिकांविरोधात नाही -
सीएए देशातील मुस्लीम बांधव आणि नागरिकांविरोधात नाही. विरोधकांचा केवळ सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये मुस्लिमांचा बळी दिला जात असून डावे आणि काँग्रेस मागे बसून मुस्लिमांना पुढे करत असल्याचा आरोप रामदास आठवलेंनी केला.

Last Updated : Jan 22, 2020, 7:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details