महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आम्ही त्यांना देणार आहोत मंत्रिपद सोळा, उद्धव ठाकरेंकडे आहे आमचा डोळा' - मुख्यमंत्रीपद

आम्ही त्यांना देणार आहोत मंत्रिपद सोळा कारण उद्धव ठाकरेंकडे आहे आमचा डोळा, अशी कविता आठवले यांनी म्हटली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचे ऐकू नये, असा सल्ला देखील उद्धव ठाकरे यांना आठवले यांनी दिला.

बोलताना रामदास आठवले

By

Published : Nov 3, 2019, 9:13 PM IST

Updated : Nov 3, 2019, 11:50 PM IST

नाशिक- आम्ही त्यांना देणार आहोत मंत्रिपद सोळा कारण उद्धव ठाकरेंकडे आहे आमचा डोळा, अशी कविता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटली. तसेच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचे ऐकू नये, असा सल्ला देखील यावेळी उद्धव ठाकरे यांना आठवले यांनी दिला. राज्यात भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावर रस्सीखेच सुरू असताना नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगत आम्ही सांगू तोच मुख्यमंत्री होणार. शिवसेनेला आमच्या शिवाय पर्याय नसल्याने शिवसेना आमच्या सोबत येणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.

जर उद्धव ठाकरे तसेच करत असतील तर माझे देखील पवार यांच्याशी संबंध चांगले असल्याचे यावेळी आठवले यांनी सांगितले. परतीच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनाची बैठक पार पडली. त्यामध्ये आठवले हे पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देताना म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येणे अशक्य आहे. ज्यांच्या जास्त जागा त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार, असे म्हणाले.


रामदास आठवले हे एक दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी नुकसान झालेल्या शेत पिकाची पाहणी केली. दुष्काळ निधीसाठी केंद्रातून मदत आणणार असल्याची ग्वाही शेतकऱ्यांना रामदास आठवले यांनी दिली. केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत उभी करणार, तसेच दहा हजार कोटींची प्राथमिक मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली असून आठ दिवसात सर्व पंचनामे पूर्ण होणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

Last Updated : Nov 3, 2019, 11:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details