नाशिक :मानवतेची शिकवण देणारी ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद शनिवारी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईदगाह मैदानावर ऐतिहासिक विशेष नमाज अदा करण्यात आली. यात हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत नमाज पठण केले. गेल्या महिन्याभरापासून मुस्लिम बांधवांचा रमजान पवित्र महिना सुरू होता. या निमित्ताने समाज बांधवांनी महिनाभर निर्जल उपवास केले. अल्लाहाच्या उपासनेत स्वतःला अधिक-अधिक व्यस्त ठेवण्यास प्राधान्य दिले. याकाळात अनेक मुस्लिम बांधवांनी पाच वेळेची नमाज अदा केली. यादरम्यान पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सर्वच मशिदीमध्ये वर्दळ पाहावयास मिळत होती. शुक्रवारी संध्याकाळी चंद्र दर्शन घडले. त्यामुळे आज रमजानच्या पवित्र महिन्याची सांगता झाली. दरवर्षीप्रमाणे शनिवारी इदगाह मैदानात सामुहिक नमाज पठण सोहळा संपन्न झाला. यावेळी मैदानाकडे येणारे सर्वच रस्ते फुलून गेले होते.
Ramadan Eid : ईदगाह मैदानावर नमाज पठणावेळी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
माणुसकीची शिकवण देणारी ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद नाशिक शहर, परिसरात मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरी केली जात आहे. यावेळी नाशिकच्या ऐतिहासिक शहाजहांगी ईदगाह मैदानात विशेष नमाज पठण सोहळा पार पडला. यात हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत नमाज पठण केले. शहर ए खतीब फीज हाफिज हिसामुद्दिन अशरफी यांनी सोहळ्याचे नेतृत्व केले.
नागरिकांना ईद निमित्त शुभेच्छा :पारंपारिक डोक्यावर इस्लामी टोपी, नवीन पठाणी कुर्ता अशा पोशाखात हजारो मुस्लिम बांधव एकत्रित जमले होते. यावेळी शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दिन अशरफी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक नमाज पठण सोहळा संपन्न झाला. नमाज अदा करण्या अगोदर अनेक मुस्लिम नागरिकांनी जकात रक्कम दान केली. विशेष दोन रकात नमाज अदर केल्यानंतर अरबी भाषेतून खतिब यांनी विशेष खुतबा वाचला. यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांनी मौन ठेवत एकाग्रतेने खुतबा ऐकला. यानंतर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी, भारताच्या उत्तर सर्वांगीण प्रगती करता दुवा अदा करण्यात आली. इदगाह मैदानातून नमाज पठणाच्या सोहळ्या दरम्यान राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. देशात अमन, शांती कायम ठेवण्यासाठी प्रगतिशील राहावे, अस आवाहन करण्यात आले. नमाज पठणानंतर राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी नागरिकांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.
छत्री, पाणी :उन्हाची तीव्रता वाढू लागताचं ज्येष्ठ नागरिकांनी मैदानात छत्र्यांचा आधार घेतल्याचे चित्र बघायला मिळालं,वाढत्या उष्मा मुळे नागरिकांनी सोबत पिण्याचे पाणी ही आणल्याचं दिसून आलं.
हेही वाचा - Aamir Salman Khan: ईदला सलमान आमिर एकत्र, चाहत्यांना प्रेम-अमरची झाली आठवण; अंदाज अपना अपना 2ची केली मागणी