महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 15, 2019, 7:26 PM IST

ETV Bharat / state

रक्षाबंधन : नाशिक पोलीस आयुक्तालयात 'राखी विथ खाकी' कार्यक्रमाचे आयोजन

जिल्ह्यातील पोलीस आयुक्त कार्यालयात रक्षाबंधन निमित्ताने 'राखी विथ खाकी' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी जिल्ह्यातील लोकांना स्वातंत्रता दिवस आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयात रक्षाबंधन

नाशिक- जिल्ह्यातील पोलीस आयुक्त कार्यालयात रक्षाबंधन निमित्ताने 'राखी विथ खाकी' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध समाजिक संस्थांनी एकत्र येत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नाशिक हे सदभावना जपणारे शहर असून, जे ट्रेनिंगमध्ये बळ मिळत नाही, ते सर्व बळ नाशिककरांनी वेळोवेळी दिले असल्याचे मत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाबद्दल माहिती देताना नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील

सर्व जाती धर्माचे लोक आज माझ्यासह पोलीस अधिकाऱ्यांना आणि गुन्हेगारांना राखी बांधण्यासाठी आले आहेत. आयुक्तालयात आज स्वातंत्रता दिवस आणि बहीण भावाच्या पवित्र नात्याचा खास सण, म्हणजे रक्षाबंधन साजरा करण्यात आला. सर्वजण एकत्रित आल्यानंतर 'खाकी विथ राखी' हा विशेष कार्यक्रम साजरा करण्यात आला होता. यात शहरातील विविध सामाजिक संस्थांनी एकत्रीत येऊन या कार्यक्रमात मोठ्या अंनदाने सहभाग नोंदवला, असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितेल.

यावेळी पोलीस आयुक्त या नात्याने आणि शहरातील महिलांचा भाऊ म्हणून माझी जबाबदारी आज अधीक वाढली आहे. त्यामुळे शहरात सुरक्षितता राखण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. त्याच बरोबर त्यांनी जिल्ह्यातील लोकांना स्वातंत्रता दिवस आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details