महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट, येवला बाजारपेठेत राखी विक्रीत घट - yeola nashik news

कोरोना फटका सर्व क्षेत्राला बसलेला असताना आता बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सणही यंदा कोरोनाच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे यावर्षी इतर सणाप्रमाणे रक्षाबंधन देखील साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Rakshabandhan festival 2020
रक्षाबंधन

By

Published : Aug 3, 2020, 4:26 AM IST

येवला (नाशिक) - रक्षाबंधन सणाडे बहीण-भावांचे प्रेमाचे प्रतिक म्हणून पाहिले जाते. मात्र, येवल्यात रक्षाबंधन असूनही कोरोनाच्या भीतीमुळे बाजारपेठेत ग्राहक येत नव्हते. रविवारी तुरळक प्रमाणात गर्दी पाहण्यास मिळत होती. आज सोमवारी असलेला रक्षाबंधन सण रविवारी ग्राहक न आल्याने राखी विक्रेत्यांची 10 टक्केसुद्धा विक्री झाली नाही. त्यामुळे विक्रेते संकटात आले असून रक्षाबंधन सणावर देखील कोरोनाचे सावट असल्याचे जाणवत आहे.

रक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट, येवला बाजारपेठेत राखी विक्रीत घट

आज (सोमवार) रक्षाबंधन सण असून देखील बाजारपेठेत रविवारी खरेदीसाठी कोरोनाच्या भीतीपोटी ग्राहक आले नाहीत. कोरोनामुळे गावी येता येत नसलेल्या भावाला पोस्टद्वारे आणि कुरियरद्वारे राखी पाठवण्यासाठी किमान आठवडाभर राखी खरेदीला सुरुवात होते.

हेही वाचा -'महिलांचा सन्मान राखणारा शिवरायांचा महाराष्ट्र हे मुख्यमंत्र्यांनी कृतीतून दाखविण्याची वेळ'

कोरोना फटका सर्व क्षेत्राला बसलेला असताना आता बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सणही यंदा कोरोनाच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे यावर्षी इतर सणाप्रमाणे रक्षाबंधन देखील साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details