नाशिक -छत्रपती शिवाजी महाराजांनी आजच्या दिवशी विश्रामगडावर विश्रांती केल्याची नोंद इतिहासात उपलब्ध आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत आज या किल्ल्यावर शिवपदस्पर्श दिन साजरा झाला. मुसळधार पावसातही संभाजीराजे यांनी किल्ल्यावर चढाई करत वंदना दिली. (sambhajiraje chhatrapati on vishramgad)
संभाजीराजे छत्रपती विश्रामगडावर संभाजीराजेंच्या उपस्थितीत शिवपदस्पर्श दिन साजरा -
आज मुसळधार पावसातही संभाजीराजेंनी किल्ल्यावर चढाई करत वंदना दिली. यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने उजळून निघण्याचे भाग्य फार कमी गड-किल्ल्यांच्या नशिबी आले. महाराजांनी स्वराज्यात असलेल्या अनेक किल्ल्यांना भेटी दिल्या. मात्र, महाराजांना पन्नास वर्षांचे आयुष्य लाभले. त्यात मोहिमा, युद्ध, घोडदौड असे एकूण दगदगीचा त्यांचा प्रवास राहिला.
हेही वाचा -CM Thackeray Spine surgery मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरील स्पाईन सर्जरी यशस्वी
आयुष्यात त्यांच्या वाट्याला सुखाचे, विश्रांतीचे दिवस फार कमी वाट्याला आले. जास्त काळ घालवलेल्या रायगड आणि राजगडाच्या भाग्यवान किल्ल्यांच्या पंक्तीला बसण्याचे भाग्य पट्टा किल्ला म्हणजेच विश्रामगडाला मिळाले. संभाजीराजे छत्रपतींनी आज या विश्राम गडावर जात शिवपदस्पर्श दिन साजरा केला. यावेळी शिवप्रेमी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.