महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुम्ही चांगले काम करा, आम्ही तुमची नक्की कदर करू - राजेश टोपे - राजेश टोपे यांची वैद्यकीय स्टाफला कौतुकाची थाप

मालेगाव येथे कोरोनाबाधितांची समस्या गंभीर होताना दिसत आहे. येथे काम करणाऱ्या वैद्यकिय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यांना कौतुकाची थाप देत त्यांनी वैद्यकिय कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

Rajesh Tope visit Malegaon hospital
वैद्यकिय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयाला भेट दिली

By

Published : Apr 29, 2020, 10:12 PM IST

मालेगाव (नाशिक) - तुम्ही चांगले काम करा, आम्ही तुमची नक्की कदर करू. स्पेशली तुम्हाला भेटायला आलो आहे, अशी कौतुकाची थाप देत त्यांनी वैद्यकिय कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. मालेगावच्या जीवन रुग्णालयाला भेट देऊन तेथील वैद्यकीय अधीक्षक व सर्व स्टाफ यांच्याशी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संवाद साधला. मालेगावला कोरोनामुक्त करण्याचे आपले लक्ष्य असल्याचे ते यावेळी म्हणाले. जी काही मदत लागेल ती सर्व मदत होईल. माझ्याशी डायरेक्ट संवाद साधा, असा विश्वास टोपे यांनी सर्व डॉक्टर व इतर स्टाफला दिला.

वैद्यकिय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयाला भेट दिली

यावेळी आरोग्यमंत्री यांनी कोरोनाबाधितांची सद्यस्थिती जाणून घेतली व तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन दिले. तुम्ही चांगली आरोग्य सेवा द्या, आम्ही तुमची कदर करू असेही ते म्हणाले.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मालेगावला भेट देऊन सामान्य रुग्णालयात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्व डॉक्टर, पोलीस, मनपा अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आढावा घेतला. यावेळी कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरेसह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी होते.

ABOUT THE AUTHOR

...view details