सटाणा(नाशिक) - बागलाण तालुक्यातील विविध भागात आज सायंकाळी चार ते पाच वाजेदरम्यान विजेच्या कडकडाटासह तुरळक पावसाने हजेरी लावली. आज दिवसभर ढगाळ वातावरणामुळे ऊन व सावलीचा खेळ सुरू होता.
नाशिक : बागलाणमध्ये पावसाची हजेरी, शेतीकामांना वेग
राज्यातील बऱ्याच भागात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. बागलाण तालुक्यात काही शहरी भागात नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. तर ग्रामीण भागात शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे.
बागलाणमध्ये पावसाची हजेरी, शेतीकामांना वेग
परिसरातील बहुतेक शेतकऱ्यांनी आधीच शेतीकामे आटोपून घेतल्याने व कांदे चाळीत टाकून दिल्याने नुकसान टळले. सध्या टमाटर काढण्याचे काम सुरू असल्याने टमाटर तोडणाऱ्या मजुरांची तारांबळ उडाली. नेहमी प्रतीक्षा करायला लावणाऱ्या वरूण राजाने वेळेआधी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आता हंगाम पूर्व मशागतींना वेग येणार आहे.