महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान - नाशिक जिल्हा लेटेस्ट न्यूज

येवला शहरासह तालुक्यातील नागरसोल, वाईबोथी, जळगाव नेऊर, मुखेड या गावांमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील अनेक गावांना पावसाने झोडपले असून, मुखेड फाटा परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली आहेत, तसेच अनेक घरांची पत्रे देखील उडाले आहेत.

येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

By

Published : May 2, 2021, 6:11 PM IST

येवला ( नाशिक) येवला शहरासह तालुक्यातील नागरसोल, वाईबोथी, जळगाव नेऊर, मुखेड या गावांमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील अनेक गावांना पावसाने झोडपले असून, मुखेड फाटा परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली आहेत, तसेच अनेक घरांची पत्रे देखील उडाले आहेत.

येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

पिकांचे नुकसान

दरम्यान नागरसोल, वाईबोथी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने, शेतात काढून ठेवलेला कांदा झाकताना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या पावसामुळे भाजीपाल्याच्या पिकांना फटका बसला आहे.

हेही वाचा -'आम्हाला 2 हजार 280 मतदारांची साथ; गोकुळ व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याच्या हातात जाईल'

ABOUT THE AUTHOR

...view details