नाशिक -रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या आई चंद्रकांता गोयल यांच्या अस्थिंचे विसर्जन आज (सोमवारी) शहरातील रामकुंड येथे करण्यात आले. यावेळी पुरोहित यांच्या उपस्थितीत गोदा घाटावर विधिवत पुजा करण्यात आली. यानंतर हे अस्थिविर्जन करण्यात आले. यावेळी गोयल यांचे कुटुंबीय, भाजप नेते गिरीश महाजन आणि अन्य भाजप नेते उपस्थित होते.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या आईचे अस्थिविसर्जन गोदाघाटात - piyush goyal mother asthivisarjan
नाशिक ही कुंभभूमी आहे. यामुळे नाशिकला धार्मिकदृष्ट्या अधिक महत्व आहे. अनेक देशी-विदेशी नागरिक धार्मिक विधी किंवा आपल्या आप्तस्वकीयांच्या मरणोत्तर पूजविधीसाठी याठिकाणी येत असतात. रेल्वेमंत्री पियुष गोयल त्यांच्या मातोश्री चंद्रकांता गोयल यांच्या दशक्रिया विधीसाठी गोयल कुटुंबासह सकाळी 10 वाजेच्या सुमारास येथे दाखल झाले होते.
नाशिक ही कुंभभूमी आहे. यामुळे नाशिकला धार्मिकदृष्ट्या अधिक महत्व आहे. अनेक देशी-विदेशी नागरिक धार्मिक विधी किंवा आपल्या आप्तस्वकीयांच्या मरणोत्तर पूजविधीसाठी याठिकाणी येत असतात. रेल्वेमंत्री पियुष गोयल त्यांच्या मातोश्री चंद्रकांता गोयल यांच्या दशक्रिय विधीसाठी गोयल कुटुंबासह सकाळी 10 वाजेच्या सुमारास येथे दाखल झाले होते. यावेळी त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता बॉम्ब शोध पथकाच्या वतीने संपूर्ण गोदघाट परिसराची पाहणी देखील करण्यात आली होती.
गोदघाटावरील गो मुखाच्या तीर्थाने स्वतःचे शुद्धीकरण करत तीर्थ पुरोहित संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश शुक्ल यांनी या अस्थिविसर्जन कार्यक्रमाचे पौरोहित्य केले. सामाजिक अंतर राखत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजप नेते गिरीश महाजन यांसह अनेक स्थानिक भाजप नेते पदाधिकारी उपस्थित होते.