महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raid On Fake Mawa : गुजरातमधून आलेला हजारो किलो भेसळयुक्त मावा, मिठाई जप्त - गणेश उत्सव

Raid On Fake Mawa : सध्या गणेश उत्सवाची सगळीकडं धामधूम आहे. या धामधुमीत नाशिकमध्ये भेसळयुक्त मावा आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासनानं भेसळयुक्त माव्यावर छापेमारी केली आहे.

Raid On Fake Mawa
पकडण्यात आलेला मावा

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 12:02 PM IST

नाशिक Raid On Fake Mawa : गणेश उत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून, बाप्पाच्या आगमनाची तयारी घरोघरी जोरात सुरु आहे. अशात नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनानं द्वारका येथील एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात शुक्रवारी छापा टाकला. या छाप्यात गुजरात राज्यातून आलेला 1200 किलो भेसळयुक्त मावा मिठाई जप्त करण्यात आला आहे. या आधी देखील याच भागात अन्न व औषध प्रशासनानं ( Food And Drug Department) कारवाई करत हजारो किलो मावा जप्त केला होता. अनाधिकृत पणे भेसळयुक्त मावा मिठाईच्या गुणवत्तेबाबत तपासणी केली जाणार असल्याचं अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी उदय लोहकरे यांनी यावेळी सांगितलं.

तपासणी मोहीम राबवणार :खबऱ्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही द्वारका येथील खासगी ट्रॅव्हल्स कार्यालयावर छापा टाकला. या छाप्यात गुजरातमधून हजार ते बाराशे किलो खवा सदृश्य स्पेशल बर्फी आणण्यात आली होती. ती आम्ही जप्त केली आहे, हा गोरखधंदा करणारे कोण आहेत, याचा शोध घेतला जात असून त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे.

दुसऱ्यांदा करण्यात आली कारवाई :अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी 5 ऑगस्ट 2023 रोजी नाशिकच्या द्वारका येथील वीर ट्रॅव्हल्स आणि पार्सल सर्व्हिसेस इथं कारवाई केली होती. खासगी प्रवासी बसमधून नाशिक येथील उपनगरमधील यशराज डेअरी अॅन्ड स्वीट्स व सिन्नर तालुक्यातील आडवाडी येथील शांताराम बिन्नर यांनी गुजरातमधून डेलिशियस स्वीट्स व हलवा हे अन्नपदार्थ मागवल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर संबंधित विक्रेत्याकडून वरील अन्नपदार्थांचे नमुने घेऊन उर्वरित 130 किलो साठा जप्त करण्यात आला होता. परिवहन कायद्यानुसार खासगी प्रवासी बसनं व्यावसायिक दृष्टीनं सामान किंवा अन्नपदार्थांची वाहतूक करता येत नसल्याचं अन्न व सुरक्षा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

विशेष मोहीम राबवणार :गणेश उत्सवानिमित्तानं अन्न व औषध प्रशासनामार्फत शहरातील मिठाई व खाद्य विक्रीच्या दुकानात तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत कुठेही भेसळयुक्त किंवा मुदतबाह्य वस्तू आढळून आल्यास त्या दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाईल असं अन्न व औषध प्रशासन अधिकारी उदय लोहकरे यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा :

  1. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गोडाऊनमधून 3 लाखांचा गुटखा चोरी

ABOUT THE AUTHOR

...view details