नाशिक :भारत जोडो यात्रेत पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांनी (By Swatantra Veer Savarkar) इंग्रजांनी सावरकरांना लिहलेले पत्र वाचून दाखवले. त्यांच्या सावरकरांवरील वक्तव्याचा (Rahul Gandhi statement on Savarkar) वाद राज्यात चांगलाच पेटला आहे. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमी असलेल्या भगूरकर ग्रामस्थांनी केली आहे.
Savarkar Controversy : राहुल गांधी यांनी माफी मागावी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमी असलेल्या भगूरकरांची मागणी - राहुल गांधी यांनी माफी मागावी
भारत जोडो यात्रेत पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (By Swatantra Veer Savarkar) इंग्रजांना लिहलेले पत्र वाचून दाखवले. त्यांच्या सावरकरांवरील वक्तव्याचा (Rahul Gandhi statement on Savarkar) वाद राज्यात चांगलाच पेटला आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमी असलेल्या भगूरकरांनी नाराजी व्यक्त करत राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सावरकरांच्या जन्मभूमी असलेले भगूर गावात बंद - स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्याविषयी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भगूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकरांची भगूर ही जन्मभूमी असून येथील नागरिकांना बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यास भगूरकरांनी प्रतिसाद देत सकाळपासून शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवले. तसेच मनसेच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भगूरकरांनी नाराजी व्यक्त करत राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशा प्रतिक्रिया त्यांनी ईटीव्ही भारतला दिली.
काय आहे वाद :स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर हे माफीवीर आहेत, अशी टीका करत राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसला कायम लक्ष्य केले आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी पुन्हा हा मुद्दा पुढे आणला. गुरूवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सावरकरांनी इंग्रजांना लिहलेले पत्र वाचून दाखवले. सावरकर यांच्याबाबत मी जे वक्तव्य केले होते. त्यात चुकीचे काहीच बोललो नाही, जे ऐतिहासिक सत्य आहे तेच मी मांडले, हे सांगताना त्यांनी महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल यांनाही इंग्रजांनी तुरुंगात डांबले होते, पण त्यांनी ब्रिटीश सरकारला पत्र लिहून आपली सुटका करुन घेतली नाही. हा या दोन विचारधारेतील फरक आहे, असे वक्तव्य केले.