नाशिकमध्ये रहाड रंगपंचमीत तरुणाईचा गोंधळ नाशिक : शहरात रहाड उत्सवात प्रचंड गर्दी झाली असून येथील मंडळाच्या कार्यकर्त्यांना देखील ही गर्दी सांभाळणे अश्यक्य झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. जुने नाशिक भागातील तिवंधा चौक येथील पेशवेकालीन रहाड येथे सर्वच भागातून मोठ्या संख्येने तरुणाई एकत्रित आल्याने आणि रहाडीमध्ये डुबकी मारण्यासाठी गर्दी केल्याने गोंधळ उडाला होता. यावेळी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
250 वर्षांची परंपरा : नाशिक शहरात रंगपंचमी निमित्त तिवंधा चौक, शनी चौक, गाडगे महाराज पूल आणि जुनी तांबट गल्ली अशा चार ठिकाणी पेशवेकालीन रहाड रंगोत्सव साजरा केला जातो. नाशिकमध्ये 250 वर्षांपासूनची रहाड परंपरा आजही कायम आहे. रंगपंचमीला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने शहरात असणाऱ्या चार ठिकाणच्या बुजवलेल्या रहाडीची खुल्या केल्या जातात. 25 बाय 25 फुटांचा चौरस आणि साधारणपणे 10 ते 12 फुटांची खोली असलेल्या हौदात नैसर्गिक फुलांपासून तयार केलेले रंग या हौदात टाकले जातात. रहाडीची पारंपरिक पूजा करू नाशिककर नागरिक या रहाडीत उडी मारून रंग उत्सव साजरा करतात.
शॉवर रंगपंचमी : नाशिकमध्ये गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शॉवर रंगपंचमी खेळली गेली. शहरात ठीक ठिकाणी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भद्रकाली परिसरातील गाडगे महाराज पुतळा, बुधवार पेठ, साक्षी गणेश मंदिर अशा प्रमुख ठिकानी शॉवर रंगोत्सवानिमित्त हजारो नागरिकांनी शॉवर रंगपंचमीचा आनंद लुटला. यावेळी संगीताच्या तालावर हजारो तरुणाई थिरक्तांना दिसून आली.
नैसर्गिक रंगांचा वापर : पेशवेकालीन राहाडीत नैसर्गिक फुलांपासून तयार केलेले रंग टाकले जातात. ज्यामुळे त्वचा रोग होत नाही. तसेच उन्हाळ्यात ऊन बाधत नाही, अशीही आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे आबालवृद्धांपासून युवकांची इथं रंग खेळण्यासाठी प्रचंड गर्दी होते. यात शनिचौक, पंचवटी येथे गुलाबी रंगाची रंगपंचमी खेळली जात असते. गाडगे महाराज पुलाजवळ पिवळा रंगाने रंगपंचमी खेळली जाते तसेच रोकडोबा तालीम संघ, मधळी होळी तालमी जवळ केशरी-नारंगी रंगाने होळी खेळली जाते, असे या रहाड रहाडीचे वैशिष्ट आहे.
हेही वाचा : Nashik Rang Panchami : नाशिकला खेळली जाते पेशवेकालीन रहाड परंपरेतील रंगपंचमी