नाशिक :मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर सकाळी शिवाजी पार्कमध्ये मॉर्निग वॉक करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याने ते जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे, या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक मधील मनसैनिक आक्रमक झाले,त्यांनी नाशिकच्या राजगड या कार्यालयाबाहेर आंदोलन केले यावेळेस अज्ञात हल्लेखोरांना विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली,तसेच या भ्याड हल्ल्याचा त्यांनी निषेध केला.या हल्लेखोरांवर गृहमंत्री यांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाईल उत्तर देण्यात येईल असा इशारा यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे..
लाकडी दंडुके घेऊन आंदोलन :मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याने त्याचे पडसाद नाशिक मध्ये दिसून आले, एकेकाळी नाशिक हा बालेकिल्ला होता,याच नाशिक शहरात मनसे सैनिकांनी,मनसेच्या राजगड कार्यालया बाहेर आंदोलन केल,यावेळी आंदोलनकर्त्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी हातात लाकडी दंडुके घेऊन जोरदार घोषणाबाजी केली,हल्लेखोरांना त्वरीत अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.