नाशिक -मुंबईतील नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर नाशकातील आदिवासी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. डॉ. पायल तडवी प्रकरणातील संशयित आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, या प्रमुख मागणीसह संशयित आरोपींची नार्को टेस्ट करावी, या मागणीसाठी आज नाशिकमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले.
डॉ .पायल तडवी आत्महत्या प्रकरणी नाशिकमधील आदिवासी संघटना आक्रमक - doctor'
डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येत प्रवृत्त करणाऱ्या डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहरे, डॉ. अंकिता खंडेलवाल या वरिष्ठ वैद्यकीय प्रशिक्षणार्थींवर अॅट्रॉसिटी, सदोष मनुष्यवध व अँटी रॅगिंग कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा व्हावी, यासाठी महाराष्ट्र आदिवासी बचाव समिती संघटनेच्या वतीने गोल्फ क्लब मैदान येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
![डॉ .पायल तडवी आत्महत्या प्रकरणी नाशिकमधील आदिवासी संघटना आक्रमक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3469719-819-3469719-1559650469362.jpg)
महाराष्ट्र आदिवासी बचाव समिती संघटनेच्या वतीने गोल्फ क्लब मैदान येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात लहान मुलांसह, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईच्या नायर रुग्णालयातील वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या आदिवासी समाजाच्या डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येत प्रवृत्त करणाऱया डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहरे, डॉ. अंकिता खंडेलवाल या वरिष्ठ वैद्यकीय प्रशिक्षणार्थींवर अॅट्रॉसिटी, सदोष मनुष्यवध व अँटी रॅगिंग कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शहरात मुक आंदोलन करण्यात आले होते.