महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संभाजी ब्रिगेडकडून व्यंकय्या नायडूंचे पोस्टर जाळून निषेध - vainkaiah naidu controversy news

राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेताना उदयनराजे भोसले यांनी केलेल्या जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषावर सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप नोंदवल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले. भाजप व आरएसएस निगडित संघटनांचा पहिल्यापासून शिवाजी महाराज या नावाला विरोध आहे. उदयनराजे भोसलेंनी केलेल्या घोषणेचा विरोध हा छत्रपतींचा व महाराष्ट्राचा अपमान आहे, असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.

Protest by Sambhaji Brigade by burning posters of Vaikyanya Naidu
संभाजी ब्रिगेडकडून वैकंय्या नायडूंचे पोस्टर जाळून निषेध

By

Published : Jul 23, 2020, 4:57 PM IST

नाशिक - राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेताना उदयनराजे भोसले यांनी केलेल्या जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषावर सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप नोंदवल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले. यावेळी नायडू यांचे पोस्टर जाळत भाजप व संघ परिवाराविरुध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडकडून व्यंकय्या नायडूंचे पोस्टर जाळून निषेध

बुधवारी राज्यसभेत उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेताना जय भवानी जय शिवाजी असा जयघोष केला होता. यावेळी सभापती नायडू यांनी हे माझे चेंबर असून असा जयघोष चालणार नाही अशी उदयनराजे यांना समज दिली होती.

हेही वाचा- 'जगभर लुंगी घालून फिरणाऱ्या व्यंकय्या नायडूंचा शिवरायांच्या घोषणेला विरोध का?'

या घटनेविरुध्द महाराष्ट्रात वातावरण तापले असून विविध संघटना रस्त्यावर उतरुन या घटनेचा निषेध नोंदवत आहे. संभाजी ब्रिगेडने शहरातील भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध नोंदवला. भाजपला जय श्रीराम चालते, पण शिवाजी महाराज नको. दिल्लीतील व राज्यातील फडणवीस सरकार शिव छत्रपती का आशीर्वाद अशी घोषणा देऊन सत्तेत आले. भाजपने फक्त निवडणुकीपुरता शिवरायांचा वापर केला. भाजप व आरएसएस निगडित संघटनांचा पहिल्यापासून शिवाजी महाराज या नावाला विरोध आहे. उदयनराजे भोसलेंनी केलेल्या घोषणेचा विरोध हा छत्रपतींचा व महाराष्ट्राचा अपमान आहे, असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी नायडू यांचे फोटो असलेले पोस्टर जाळून जोरदार निषेध नोंदविला.

ABOUT THE AUTHOR

...view details