नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पवारांच्या समर्थनार्थ राज्यभर निदर्शने आणि आंदोलने केली.
पवारांच्या बचावासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर - अजित पवार ईडी गुन्हा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आले.

हेही वाचा - सिन्नर येथे 55 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू , पोलीस तपास सुरू
नाशिकमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सरकारच्या विरोधात निदर्शने झाली. यावेळी सरकार आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सूडबुद्धीने आणि विरोधकांचे खच्चीकरण करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी रवींद्र पगार यांनी सरकारवर केला. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ही कारवाई केली जात असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.