येवला (नाशिक) :पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल झरदारी भुट्टो (Pakistan Foreign Minister Bilawal Bhutto Zardari) यांनी न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेत सर्व मर्यादा ओलांडल्या आणि भारताचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निंदनीय टीका (Offensive statements against Narendra Modi) केली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला घेरण्यात अपयशी ठरलेल्या बिलावल भुट्टो यांनी "गुजरातचा कसाईही जिवंत आहे," असे निंदनीय वक्तव्य केले. त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. यांच्या वक्तव्याबद्दल नाशिकमधील येवला येथे त्यांच्या फोटोला जोडे मारून आणि त्यांचा फोटो दहन करून निषेध व्यक्त (Protest again Pakistan foreign minister) करण्यात आला. (Latest news from Nashik)
Protest Against Bilaval Bhutto : भाजयुमो वतीने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून प्रतिमेचे दहन - पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भूट्टो झरदारी
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भूट्टो झरदारी (Pakistan Foreign Minister Bilawal Bhutto Zardari) यांनी भारत देशाबद्दल व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान (Offensive statements against Narendra Modi) केले. याचा विरोध म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने अटलबिहारी वाजपेयी चौक येवला येथे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री झरदारी यांच्या वक्तव्याबद्दल त्याच्या फोटोला जोडे मारून आणि त्यांचा फोटो दहन करून निषेध व्यक्त (Protest again Pakistan foreign minister) करण्यात आला. तसेच पाकिस्तान मुर्दाबाद, नरेंद्र मोदी जिंदाबाद अशा घोषणा (sloganeering against Pakistan) देण्यात आल्या.
हा भारताचा अपमान :पाकिस्तानी मंत्र्याने असे वक्तव्य करणे हा भारताचा अपमान आहे. पाकिस्तान अनेक दशकांपासून सतत दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना आश्रय आणि प्रोत्साहन देत आहे. पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा आणि आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे आणि तेथे भीषण अंतर्गत संघर्ष आणि जीवघेणी मारामारी होत आहे. त्यांनी आपल्या देशाकडे लक्ष द्यावे आम्ही युवा मोर्चातर्फे त्यांचा इतर निषेध करतो, असे विधान युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मयुर मेघराज यांनी केले.
या कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग :त्याप्रसंगी जिल्हा कोषाध्यक्ष प्रमोद सस्कर, जिल्हा नेते मनोज दिवटे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तमजी रहाणे , शहराध्यक्ष तरंग गुजराती, महिलामोर्चा अध्यक्ष अनुपमा मडे, रत्नाताई गवळी, उपाअध्यक्ष जितेंद्र करेकर, बाबूजी खानापुरे, मनोज पैंजणे, हेमचंद्र व्यवहारे आदि कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.