मनमाड (नाशिक) -केंद्रातील भाजपा सरकारने भारतीय रेल्वे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील 109 रेल्वेमार्गावर असलेल्या 151 रेल्वेगाड्या खासगी कंपन्यांना चालवण्यासाठी देशविदेशातील कंपन्यांना निमंत्रित केले आहे. याविरोधात भारतीय व्यापारी संघटनांचे केंद्र सीआयटीयु देशभरात विरोध प्रदर्शन करत आहे.
रेल्वेचे खासगीकरण; मनमाडमध्ये केंद्रसरकारच्या निर्णयाविरोधात निदर्शने - citu protest manmad
मनमाड शहरात देखील आज (गुरुवारी) केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात प्रदर्शन करण्यात आले. येथील वरिष्ठ सहायक अधिकारी यांच्या कार्यालयासमोर नॅशनल रेल्वे मजदूर युनियन व सीआयटीयुने धरणे देत जोरदार निदर्शने केली. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. वरिष्ठ सहायक अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मनमाड शहरातदेखील आज (गुरुवारी) केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात प्रदर्शन करण्यात आले. येथील वरिष्ठ सहायक अधिकारी यांच्या कार्यालयासमोर नॅशनल रेल्वे मजदूर युनियन आणि सीआयटीयुने धरणे देत जोरदार निदर्शने केली. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. वरिष्ठ सहायक अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
एकीकडे नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारताचा विचार मांडत आहेत. तर दुसरीकडे भारतीय रेल्वे विकण्याचा घाट घालत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसह सामान्य जनतेलाही याचा मोठा फटका बसणार आहे. याविरोधात सीआयटीयूने देशभर आंदोलन सुरू केले आहे. मनमाड शहरातही आज (गुरुवारी) नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या सदस्यांनीही पाठिंबा देत सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला. यावेळी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे कॉ. अंबादास निकम, सबरीश नायर, हेमंत डोंगरे, सुनील गडवे, किरण कातकडे, मिलिंद लिहणार, प्रवीण बागुल, रमेश केदारे, सुरेश पगारे, सचिन काकड, नवनाथ आव्हाड तर सीआयटीयुचे रामदास पगारे, तुकाराम सोनजे, जॉर्ज जॉनी, किशोर आहिरे आदी उपस्थित होते.