नाशिक- शहरात ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने उपचार घेत असलेल्या रुग्णांना रुग्णालयातून हलवण्याची वेळ ओढवली आहे. यातच रुग्णालयामध्ये ऑक्सिजन व रेमडिसिवीर उपलब्ध होत नाही. हीच परिस्थिती राहिली तर येत्या दोन दिवसात परिस्थिती गंभीर होईल, असा इशारा हॉस्पिटल असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे.
नाशिक शहरात गेल्या महिनाभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. शहरात दररोजच हजारो बाधितांची भर पडत असल्याने आता रुग्णालयामध्ये ऑक्सिजन आणि इतर सुविधा उपलब्ध होत नाही. हीच परिस्थिती राहिल्यास पुढील दोन दिवसात रुग्णांवर उपचार करणे अवघड होईल, अशी भीती हॉस्पिटल असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे. हॉस्पिटल असोसिएशनच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन बिघडलेल्या या परिस्थितीला जिल्हा प्रशासन अप्रत्यक्षपणे जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. तर येत्या दोन दिवसांत जिल्ह्यासह नाशिक शहरातील खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन आणि रेमडिसिविर उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून दोन दिवसांत मागण्यांची पूर्ण न झाल्यास खासगी डॉक्टर असोसिएशनने काम करण्यात असमर्थता दर्शवली आहे.
ऑक्सिजन अन् इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना इतरत्र हलवण्याची परिस्थिती