नाशिक- आयुष्य जगत असताना कळत नकळत एखाद्या मोठ्या गुन्ह्यात अडकून अनेक बंदिवान कैदी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. याच कारागृहातील कैदींमध्ये काही कलाकारही दडलेली आहे. हे वारंवार सिद्ध देखील झालेले आहे. कैदींनी कोरोनाच्या काळात लाखो मास्क बनवल्यानंतर आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यातील काहींनी आकर्षक आणि सुबक गणेशमूर्ती घडविल्या आहेत.
नाशिक: कैद्यांनी सिद्ध केली कलाकारी, साकारल्या ५५० आकर्षक गणेश मूर्ती - nashik central jail
या वर्षी कैद्यांनी ५५० गणेश मूर्ती साकारल्या आहेत. विशेष म्हणजे, या मूर्ती पर्यावरण पुरक असल्याने निसर्गाची हानी टाळण्यासाठी त्यांची मोठी मदत होणार आहे. मध्यवर्ती कारागृहात गेल्या ३ वर्षांपासून गणेश मूर्ती तयार करण्यात येत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती घडविण्याची संख्या कमी झाली आहे.
![नाशिक: कैद्यांनी सिद्ध केली कलाकारी, साकारल्या ५५० आकर्षक गणेश मूर्ती नाशिक मध्यवर्ती कारागृह](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8403323-thumbnail-3x2-op.jpg)
गणेश मूर्ती
माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी
या वर्षी कैद्यांनी ५५० गणेश मूर्ती साकारल्या आहेत. विशेष म्हणजे, या मूर्ती पर्यावरण पुरक असल्याने निसर्गाची हानी टाळण्यासाठी त्यांची मोठी मदत होणार आहे. मध्यवर्ती कारागृहात गेल्या ३ वर्षांपासून गणेश मूर्ती तयार करण्यात येत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती घडविण्याची संख्या कमी झाली आहे.
हेही वाचा-नाशिक : ऑनलाईन वस्तू खरेदीच्या बहाण्याने दुकानदारांची फसवणूक, 3 लाखांचा गंडा