महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नाशिकमध्ये जाहीर सभा - दिंडोरी

दिंडोरी, नाशिक, धुळे, नंदुरबार, शिर्डी मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा होणार आहे. सकाळी १० वाजता सभेला सुरुवात होणार आहे.

नाशिक

By

Published : Apr 22, 2019, 8:12 AM IST

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (सोमवार दि.२२) मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा होणार आहे. दिंडोरीतील युतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. या सभेची तयारी पूर्ण झाली असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

दिंडोरी, नाशिक, धुळे, नंदुरबार, शिर्डी मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा होणार आहे. सकाळी १० वाजता सभेला सुरुवात होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, धुळ्याचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील व नाशिकचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांच्यासह दोन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details