नाशिक - कोरोनाचा वाढता संसर्ग बघता देशातील ज्या राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर आहे अशा 56 जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. यात महाराष्ट्रातील नाशिकसह 17 जिल्ह्यांचा समावेश आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणार आहे. या माध्यमातून ते जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत.
नाशिक : पतंप्रधान मोदी जिल्हाधिकारी मांढरे यांच्याशी साधणार संवाद - नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे लेटेस्ट न्यूज
देशातील कोरोना रुग्णांचे वाढते आकडे चिंताजनक असून दिवसाला तीन ते चार लाख इतके पाॅझिटिव्ह रुग्ण सापडत आहे. पंतप्रधान मोदी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत असून परिस्थितीचा घेत उपाययोजनांची माहिती घेत आहे.
देशातील 56 जिल्हाधिकार्यांसोबत मोदी साधणार संवाद
देशातील कोरोना रुग्णांचे वाढते आकडे चिंताजनक असून दिवसाला तीन ते चार लाख इतके पाॅझिटिव्ह रुग्ण सापडत आहे. पंतप्रधान मोदी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत असून परिस्थितीचा घेत उपाययोजनांची माहिती घेत आहे. त्याचा पुढील टप्पा म्हणजे मोदी जास्त अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रासह केरळ, प. बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा या राज्यातील 56 जिल्हाधिकार्यांसोबत पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहे. हा आढावा घेताना कोरोनाव्यतरिक्त आणखी काही विषय चर्चेला येणार काय, याची सध्यातरी जिल्हाधिकार्यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
अहवाल तयार करण्याची मोहीम गतिमान
कोरोनासोबतच म्युकरमायकोसिस, कोरोनाच्या तिसर्या लाटेची तयारी ,सध्याची रुग्ण संख्या, उपचार, भविष्यातील अडचणी, लहाण मुलांच्या बेडची व्यवस्था यासह इतर विषय हाताळण्याची शक्यता आहे. त्यानुसार संबंधित विषयाचे अहवाल तयार करण्याची मोहीम गतिमान केली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. दरम्यान या बैठकीला मोदींसोबत निती आयोगाचे सदस्य व त्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी येत्या गुरुवारी ऑनलाइन संवाद साधणार आहे. नेमके कोणत्या मुद्यांच्या आढावा घेतील यावर भाष्य करणे अवघड असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यानी सांगितले आहे.