महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Market : नाशिकच्या बाजारात पालेभाज्यांचे भाव कोलमडले; जनावरांच्या चाऱ्यापेक्षा भाजीपाला स्वस्त

नाशिक बाजारात पालेभाज्यांचे भाव अगदी कोलमडले ( Prices of Leafy Vegetables have Collapsed in Nashik Market ) आहेत. जनावरांच्या चाऱ्यापेक्षा भाजीपाला स्वस्त झाला ( Vegetables have Become Cheaper Than Animal Fodder ) आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्याने ( Due to Increase in Arrival of Leafy Vegetables ) भाज्यांचे दर कोलमडले आहेत.

By

Published : Dec 19, 2022, 6:29 PM IST

नाशिक :सध्या उसाच्या भांडीचा पशुपालकांना पुरवठा केला तरी त्याला 80 ते 100 रुपये शेकड्याचा भाव शेतकऱ्यांना ( Prices of Leafy Vegetables have Collapsed in Nashik Market ) मिळतोय. जवळपास जनावरांच्या सर्वच वैरणीचे दर वाढलेले ( Vegetables have Become Cheaper Than Animal Fodder ) आहेत, दुसरीकडे भाजीपाल्यांचे दर मात्र इतके कोसळले आहे ( Due to Increase in Arrival of Leafy Vegetables ) की, ते विकूनही शेतकऱ्यांना खर्च वसूल होत नाही, अशी परिस्थिती आहे. मागील काही दिवसांत गगनाला भिडलेले भाजीपाल्यांचे दर एकदम कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तर व्यापारी आणि ग्राहकांना मात्र यामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.

जनावरांचा चारा महाग :अनेक शेतकरी 3000 ते 3500 रुपये टनापर्यंत तबेल्यांना उसाचा पुरवठा करतात. तर फक्त बांडीचा दर 80 ते 100 रुपये शेकडा इतका आहे. मक्याचा दरही महाग आहे.

नाशिक बाजारात पालेभाज्यांचे भाव कोलमडले

वाहतूक खर्चही निघत नाही :यंदा मोठ्या अपेक्षेने मेथी आणि पालकचे उत्पादन घेतले. पण, भाजी बाजारात आणेपर्यंत तिथे दर कवडीमोल झाले. पाच-सहा रुपयांना जोडी विकली जात आहे. त्यामुळे उत्पादन खर्च सोडा पण वाहतूक खर्चदेखील निघत नाही. त्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने काय करावा, असा प्रश्न निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

नाशिक बाजारात पालेभाज्यांचे भाव कोलमडले; जनावरांच्या चाऱ्यापेक्षा भाजीपाला स्वस्त

रोज वेगवेगळ्या भाज्या करता येतात :गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्यांचे दर स्वस्त झाल्यानंतर रोज जेवणात वेगवेगळ्या भाज्या करणे शक्य झाले आहे. त्यामुळे भाजीचा प्रश्न तरी मिटला आहे, मात्र इतर किराणा महाग असल्याचं गृहिणींनी सांगितले.

पालेभाज्यांचे भाव :पालक 10 रुपये जुडी, मेथी 12 रुपये जोडी, करडई 10 रुपये जोडी, शेपू 10 रुपये जुडी, कांदापात 25 रुपये जुडी, कोथिंबीर 20 रुपये जुडी, कांदा 10 रुपये किलो, टोमॅटो 15 रुपये किलो, बटाटा 29 रुपये किलो, फ्लाॅअर 10 रुपये कंद, पत्ता कोबी 10 रुपये कंद.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details