नाशिक - विरोधी पक्षनेते लोक संकटात आहे तिकडे भेटी देत आहेत. यातून मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यावा, स्वागताचे कार्यक्रम घ्यायचे की शेतकरी भेटी घ्यायच्या, हा विरोधात भास तुम्हीच बघत आहेत असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवस नाशिक आणि धुळे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलत होते.
मालेगाव जिल्हा निर्मिती बाबत निर्णय घेतल्यावर बघू - सरकार स्थापन होऊन जवळपास एक महिना झाला, राज्याला मंत्री नाहीत, राज्यात पूरपरिस्थिती असताना काम करण्यासाठी मंत्री मंडळ टीम असणे आवश्यक आहे. एकीकडे विरोधी पक्षनेते लोक संकटात आहेत तिकडे भेटी देत आहेत. यातून मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यावा, स्वागताचे कार्यक्रम घ्यायचे की शेतकरी भेटी घ्यायच्या, हा विरोधात भास तुम्हीच बघत आहात असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. मालेगाव जिल्हा निर्मिती बाबत निर्णय घेतल्यावर बघू असे ही पवार यांनी म्हटले आहे. सरकार पडेल निवडणुका लागतील हे सांगायला मी ज्योतिष नाही तरी निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत अस त्यांनी सांगितले आहे.