नाशिक - चक्रीवादळाचा मनमाड नांदगांव तालुक्यातील अनेक गावांना तडाखा बसला आहे. अचानकपणे आलेल्या या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. केळीच्या बागा, कांद्याचे शेड जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला ( rains damage banana orchards in nangaon nashik ) आहे.
या नुकसानग्रस्त भागांची तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर दिल आहे. पंचनामा करुन त्वरित शासनाला अहवाल पाठवण्यात येईल, असं मोरे यांनी सांगितलं आहे.