येवला -अक्षय्य तृतीयेसाठी आवश्यक असणारे कऱ्हा, केळी बनवणाऱ्या कुंभारांना सलग दुसऱ्या वर्षी देखील कोरोनामुळे फटका बसला आहे. तयार केलेले कऱ्हा, केळी विकण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कुंभार व्यवसायिकांनी केली आहे.
अक्षय्य तृतीया करता कऱ्हा, केळी तयार करणाऱ्या येवल्यातील कुंभारांना कोरोनाचा फटका बसला असून, सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे सावट या सणावर आहे. अक्षय्य तृतीयाला मातीपासून तयार केलेल्या कऱ्हा, केळीला विशेष महत्त्व आहे. मात्र कोरोनामुळे सर्व बाजरपेठ बंद असल्याने तयार केलेल्या कऱ्हा, केळी कशा विकणार असा प्रश्न कुंभार व्यवसायिकांना पडला आहे. प्रशासनाने आम्हाला कऱ्हा, केळी विकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कुंभार व्यवसायिकांनी केली आहे.