महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लघु उद्योगांना पुनर्जीवित करणासाठी बँकांची सकारत्मक मानसिकता गरजेची' - nashik latest news

बँकांनी लघु उद्योगांना मदत करण्यासाठी सकारात्मक भूमिका ठेवण गरजेचं असल्याचे मत, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी व्यक्त केले.

pradip peshkar
भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार

By

Published : May 14, 2020, 6:45 PM IST

नाशिक - कोरोनाच्या काळात अडचणीत सापडलेल्या लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांना पुनर्जीवित करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी बिनव्याजी, विनातारण 3 लाख कोटींच्या कर्ज वाटपाची घोषणा केली. मात्र, असं असलं तरी बँकांनी लघु उद्योगांना मदत करण्यासाठी सकारात्मक भूमिका ठेवण गरजेचं असल्याचे मत, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी व्यक्त केले.

भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या देशाला दिलासा देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अंतर्गत 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजच्या माध्यमातून अडचणीत सापडलेला भारतीय पुन्हा एकदा भरारी घेईल, असा विश्वास पंतप्रधान यांनी व्यक्त केला. याच पॅकेजचा एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी लॉकडाऊन काळात अडचणीत सापडलेल्या लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांना उभारी मिळण्यासाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या उद्योगांना विनातारण, विनाव्याजी 3 लाख कोटींचे कर्ज देण्याची घोषणा केली आहे. तसेच विविध योजनांच्या माध्यमातून या उद्योगांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत.

निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेचे उदयोग क्षेत्रातून स्वागत करण्यात आले आहे. मात्र, असं असलं तरी बँकांनीसुद्धा लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांना कर्ज वाटप करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन सहकार्य केले पाहिजे. तसेच याबाबत बँक व्यवस्थापणाल मार्गदर्शन केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details