नाशिक-जिल्ह्यातील सटाणा येथे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या टवाळखोरांना पोलिसांनी रस्त्यावरच अडवून दंडूक्याचा प्रसाद देत शंभर-शंभर उठबशा काढायला लावल्या होत्या. या कारवाईमुळे टवाळखोर चांगलेच वठणीवर आले आहेत.
नाशिकमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई - corona lockdown nashik
कोरोनाशी संपूर्ण देश जिकरीने लढा देत असताना ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या गावात काही टवाळखोर लॉक डाऊनचे सर्रास उल्लंघन करत आहेत. प्रशासन व पोलिसांकडून वारंवार समज देऊनही मोटारसायकल गावभर फिरवून भाईगिरी करण्यात धन्यता मानणाऱ्यांवर पोलिसांकडून सक्त कारवाई करण्यात येत आहे.
कोरोनाशी संपूर्ण देश जिकरीने लढा देत असताना ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या गावात काही टवाळखोर लॉक डाऊनचे सर्रास उल्लंघन करत आहेत. प्रशासन व पोलिसांकडून वारंवार समज देऊनही मोटारसायकल गावभर फिरवून भाईगिरी करण्यात धन्यता मानणाऱ्यांवर पोलिसांकडून सक्त कारवाई करण्यात येत आहे. सटाणा येथे रस्त्यावर विनाकारण फिरून समाज स्वास्थ्य बिघडवणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी रस्त्यावरच अडवून दंडूक्यांचा प्रसाद देत शंभर-शंभर उठबशा काढायला लावल्या आहेत. सटाणा पोलिसांच्या कारवाईचे स्वागत करण्यात येत असून, टवाळखोर वठणीवर येऊ लागले आहेत.