महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईहुन गावाकडे पायी निघाले 106 परप्रांतीय, पोलिसांनी घेतले ताब्यात

गुरुवारी मुंबई येथून अशाचप्रकारे पायी मध्यप्रदेश भागात जाणाऱ्या 106 परप्रांतीय नागरिकांना नाशिक पोलिसांनी मुंबई नाका भागातून ताब्यात घेतले. त्यांची शेल्टर कॅम्पमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे.

नाशिक-मुंबईहुन गावाकडे पायी निघाले 106 परप्रांतीय नागरिक, पोलिसांनी घेतले ताब्यात
नाशिक-मुंबईहुन गावाकडे पायी निघाले 106 परप्रांतीय नागरिक, पोलिसांनी घेतले ताब्यात

By

Published : Apr 24, 2020, 8:39 AM IST

Updated : Apr 24, 2020, 10:23 AM IST

नाशिक - लॉकडाऊनचे दिवस जसे वाढत आहे तसे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्या अडचणीत अधिक वाढ होत आहे. परिणामी मुंबईतील अनेक रोजंदारी करणारे नागरिक प्रशासनने दिल्याने आदेशाला धुडकावून पायीच घरचा रस्ता धरताना दिसत आहे.

नाशिक-मुंबईहुन गावाकडे पायी निघालेल्या 106 परप्रांतीय नागरिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

गुरुवारी मुंबई येथून अशाचप्रकारे पायी मध्यप्रदेश भागात जाणाऱ्या 106 परप्रांतीय नागरिकांना नाशिक पोलिसांनी मुंबई नाका भागातून ताब्यात घेतले. त्यांची शेल्टर कॅम्पमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, ठिकठिकाणी जिल्हाबंदी असतानासुद्धा मुंबईहून नाशिकपर्यंत 200 किमीचा पायी प्रवास करून हे पोहचले कसे, त्यांना ठाणे, इगतपुरी येथील चेकपोस्टवर पोलिसांनी अडवले का नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले असून, प्रत्येक ठिकाणी जिल्हाबंदी करण्यात आली आहे. मात्र, तरीही शासन निर्णयाला धाब्यावर बसवत नागरिक या ना त्या मार्गाने पळवाटा शोधून कोरोनाला आयते निमंत्रण देत आहेत. देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून दुसरीकडे मजुरांची स्थलांतरासाठी धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत ठाणे, इगतपुरी आणि विल्लोळी येथील पोलिसांचा खडा पहारा चुकवत शंभर ते दीडशे नागरिकांनी नाशिकमध्ये प्रवेश केला.

नाशिकच्या उड्डाणपुलावरून मार्गस्थ होत असताना पोलिसांना याची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी उड्डाणपूल दोन्ही बाजूनी सील करत या जमावाला ताब्यात घेतले आणि काही वाहनांमध्ये बसवून त्यांना नाशिकच्या आनंदवली येथील शेल्टर कॅम्पमध्ये ठेवण्यात आले. मात्र ठाणे, इगतपुरी आणि विल्लोळीला पोलिसांचा फौजफाटा असतानासुद्धा हा जमाव नाशिकपर्यंत कसा आला, की पोलीस बंदोबस्तात ढिलाई आली का असाच प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिक आणि इगतपुरी मिळून 1 हजार 200 जणांना वेगवेगळ्या शेल्टर कॅम्पमध्ये ठेवण्यात आले असून त्या ठिकाणी त्यांची राहण्याची जेवणाची सोय शासनामार्फत केली जात आहे.

Last Updated : Apr 24, 2020, 10:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details