नाशिक- कोरोनामुळे देशात सर्वत्र लॉकडाउन आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अशोका मार्ग परिसरात नुकताच एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. निकुंज आणि हरिणी या दोघा जणांनी अगदी साध्या पद्धतीने आपल्या घरात स्वत:चा विवाह सोहळा आटोपला. विशेष म्हणजे, पोलिसांनी गाणे वाजवून या नव दामपत्याला शुभेच्छा दिल्या.
नाशिक पोलिसांनी गाणे वाजवून वधू-वरास दिल्या लग्नाच्या शुभेच्छा
पोलिसांनी सोशल डिस्टन्स पाळत या नवविवाहित दाम्पत्यास शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, पोलिसांनी 'हा मैने भी प्यार किया है', या चित्रपटातील 'मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी' हे गाणे वाजवून टाळ्यांच्या कडकडाटात शुभेच्छा दिल्या. त्यामुळे, निकुंज आणि हरिणी या दोघांचाही विवाहसोहळा त्यांच्यासाठी अनोखा ठरला.
गुजरात सरकारची परवानगी घेऊन निकुंज एकटाच नाशिकमधील अशोका मार्ग परिसरात आला होता. त्याचा विवाह हरिणी जोशी यांच्याशी ठरला होता. विवाहप्रसंगी हरिणीच्या घरचे सदस्य उपस्थित होते. निकुंजच्या घरचे व्हिडिओ कॉलवरून सहभागी झाले. ही बाब शहर पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, सुनील रोहकले हे जोशी कुटुंबियांच्या निवासस्थानी दाखल झाले. पोलिसांनी सोशल डिस्टन्स पाळत या नवविवाहित दाम्पत्यास शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, पोलिसांनी 'हा मैने भी प्यार किया है', या चित्रपटातील 'मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी' हे गाणे वाजवून टाळ्यांच्या कडकडाटात नवदामपत्यास शुभेच्छा दिल्या. त्यामुळे, निकुंज आणि हरिणी या दोघांचाही विवाहसोहळा त्यांच्यासाठी अनोखा ठरला.
हेही वाचा-अखेर नाशिकमध्ये कोरोना टेस्टिंग सुरू, लॅबमध्ये पहिलाच रिपोर्ट निगेटिव्ह...