नाशिकChain Snatcher Police Arrested :पाच वर्षापूर्वी लाचखोरीच्या प्रकरणात सापडलेल्या एका पोलीस शिपायाने त्र्यंबकेश्वरला तहसीलदार असलेल्या श्वेता संचेती (shweta sancheti) यांच्या मानेला हिसका देत, सोनसाखळी हिसकून पळ काढल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेत सोनसाखळी चोरणाऱ्या पोलीस योगेश लोंढे याला अटक केली आहे.
सापळा रुचून केली अटक : रविवारी लक्ष्मीपूजनच्या दिवशी रस्त्याने पायी जाणाऱ्या तहसीलदार संचेती यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. दुचाकी घेऊन उभे राहलेल्या दोघांपैकी एकाने त्यांची सोनसाखळी ओढली. यानंतर सोनसाखळी चोराने दुचाकीवर बसून धूम ठोकली होती. एक अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने संशयित योगेश लोंढे याने सोनसाखळी चोरी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी संचेती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. संशयित लोंढे हा अंबड भागात येणार असल्याची माहिती, पोलिसांना मिळाली होती. यावेळी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सापळा रुचून त्याला अटक केली.
वादातून झाला गुन्ह्याचा उलगडा: सोनसाखळी चोरीनंतर साथीदार आणि लोंढे यांच्यात वाद झाले होते. हा वाद चांगलाच वाढला आणि अल्पवयीन साथीदाराने घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती सरकारवाडा पोलिसांना कळवली होती. त्यानंतर पोलीस लोंढे याच्या मागावर होते. चौकशीत तो पोलीस शिपाई असल्याचं समजलं. त्याने याआधी किती सोनसाखळ्या चोरल्या याचा तपास आता पोलीस करत आहेत.
लोंढेला याआधी लाच घेताना अटक: 2012 मध्ये 15 हजाराच्या लाचेची मागणी करून, त्यापैकी 5 हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात पोलीस शिपाई लोंढे अडकला होता. त्याच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. खाते निहाय चौकशी नंतर पोलीस आयुक्तालयाकडून करून त्याचं निलंबन करण्यात आलं होतं. निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर तो जनरल ड्युटी करत होता.
हेही वाचा -
- चोरट्यांनी धूमस्टाईल महिलेची सोनसाखळी लांबवली; कलानगर भागातील घटना
- VIDEO : दुचाकीस्वाराने लंपास केली महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी; नाशिकच्या बेलतगव्हाण परिसरातील घटना
- ठाण्यात सोनसाखळी चोरीच्या घटनांत वाढ, 18 दिवसांत आठ घटना