महाराष्ट्र

maharashtra

Spiritual Leader Murder : अफगाणी धर्मगुरू चिस्ती खूनप्रकरणात पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या; एक अद्यापही फरार

By

Published : Jul 15, 2022, 10:21 AM IST

अफगाणिस्तानचे रहिवासी असलेले मुस्लिम धर्मगुरू जफीर चिस्ती (Muslim cleric Zafir Chisti killed) यांची पंधरा दिवसापूर्वी नाशिकच्या येवला येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. (shot and killed) ,या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती,नाशिक ग्रामीण पोलिसांनी या (Nashik Rural Police) गुन्ह्याचा सखोल तपास करत चार संशयतांना बेड्या ठोकल्या आहे.

आरोपी
आरोपी

नाशिक -अफगाणी धर्म गुरुची चिस्ती हे दोन वर्षापासून नाशिक ( Nashik Crime ) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वावी येथे राहत होते,चिस्ती यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना मोठा चाहता वर्ग जोडला गेला होता,अध्यात्म बरोबर तत्वज्ञान व सुखी विचार बाबत विविध प्रकारचे व्हिडिओ यू ट्युब वर पोस्ट करत होते, त्याला लाखो संख्येने पसंती मिळत होती. त्यातून त्यांना दर महिन्याला लाखो रुपयाची रक्कम मिळत होती,या माध्यमातून त्यांनी भारतामध्ये तीन कोटी रुपयांची मालमत्ता जमवली होती, चिस्ती हे निर्वासित असल्याने त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार हे जवळचे सेवेकरी यांच्या नावावर त्यांनी केली होती. या सेविकाऱ्यांपैकी चौघांनी मिळून मालमत्तेच्या हव्यासा पोटी त्यांची गोळ्या (Muslim cleric Zafir Chisti killed )घालून हत्या केली होती.



बदलापूर येथून पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या -नाशिकच्या तीन पोलीस (Nashik Police) पथकांनी सलग पंधरा दिवस,राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आरोपींचा शोध घेतल्या नतंर अखेर लोणावळ्याजवळील बदलापूर येथे लपून बसलेल्या चौघांच्या पोलिसांनी ( Badlapur Police ) मुस्क्या आवळ्या, यात बाबाचा कार चालक रवींद्र तोरे, गणेश पाटील, पवन अहिरे,गफार खान यांचा समावेश आहे, या चौघांचे दोन साथीदार अजून फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. अवघ्या 29 वर्ष चिस्ती बाबा यांनी चार वर्षांपूर्वी भारतात स्थलांतर केलं, ते निर्वासित म्हणून भारतात आश्रयास होते, चिस्ती यांनी सुमारे तीन कोटी रुपयांची संपत्ती जमवल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. मात्र ते निर्वासित असल्यामुळे त्यांना स्वतःच्या नावावर कुठलीही प्रॉपर्टी घेता येत नसल्याने त्यांनी जंगम मालमत्तेचे व्यवहार स्थानिक सेवेच्या सेविकारांच्या नावे ते करत होते. चिस्ती बाबा यांची पत्नी दारी ना चिस्ती ही मूळ अफगाणिस्तानची नागरिक आहेत. ते सुफी संत असल्याचा दावा सोशल मीडियावर करत होते. चिस्ती बाबा हे दीड वर्षापासून नाशिकच्या सिन्नर जवळ वावी येथे वास्तव असून देखील ते कधीही नाशिक शहरात फिरकले नाहीत.

जरीब चिश्तीच्या डोक्यात गोळी झाडून ही हत्या करण्यात आली- पोलीस अधीक्षक सचिन पाटील म्हणाले की, सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती हा अफगाणी युवक सुमारे ३५ वर्षीचा आहे. आरोपीने जरीब चिश्ती यांच्या डोक्यात गोळी झाडून ही हत्या केली आहे. आरोपीने एकाच गोळीत चिश्ती यांची हत्या केली असून, हत्या करणारा आरोपी हा सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती यांचा ड्राइव्हरचं असल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केला आहे.

जरीफ बाबांनी 3 कोटींची माया जमावल्याचे समोर - नाशिकच्या ( Nashik Crime ) येवला येथे अफगाणी सुफी जरीफ बाबा चिस्ती यांच्या खून प्रकरणात 6 संशयित आरोपी ( Accused ) निष्पन्न झाले आहेत. संपत्तीच्या वादातून बाबांचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी ( Nashik Police ) वर्तवला आहे. 4 वर्षांपूर्वी भारतात आलेल्या 29 वर्षीय जरीफ बाबांनी 3 कोटींची माया जमावल्याचे तपासातून समोर आले आहे.

यू-ट्युब कडून मिळत होते लाख रुपये -चिस्ती बाबांच्या यू- ट्यूब वरील व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लोकांकडून पसंती मिळू लागल्याने यु ट्यूब कडून बाबांना लाखो रुपये महिन्यासाठी मिळत होते. बाबांच्या यू- ट्यूब चॅनलवर सुमारे 2 लाखाहून अधिक फॉलोवर्स आणि 1 लाख इतके सबस्क्राईब आहेत. मागील वर्षी यू- ट्यूब कडून त्यांना प्रमाणपत्र व सन्मानपत्र देण्यात आल होत. जाफिर बाबा यांनी हत्येच्या एक दिवस आधी 4 तारखेला भाविकांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. तेथील भेटीचा व्हिडिओ हा त्यांच्या यू-ट्युब वरील अखेरचा व्हिडिओ ठरला आहे.

हेही वाचा : Spiritual Leader Murder : पैशाच्या वादातून मुस्लिम धर्मगुरू सुफी चिस्ती यांचा खून, संशयित ड्रायव्हर फरार

हेही वाचा :Mumbai Crime : स्पा व्यावसायिकांना ब्लॅकमेल करणाऱ्या सुधीर मास्टरला मुंबई पोलिसांनी केली अटक

हेही वाचा :Saroj Khan Brutally Murdered: शंकर नगर चौकातील पेट्रोल पंपावर जवळ सरोजची खानची निर्घृण हत्या


ABOUT THE AUTHOR

...view details