नाशिक- तीन चारचाकी वाहनांमध्ये २०० किलो गांजा विक्रीसाठी घेऊन जात असताना हस्तगत करण्यात आला आहे. चेहेडी जकात नाक्यावर युनिट एक या पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी आठ संशयित ताब्यात घेण्यात आले आहे. तर, या गांजाची किंमत २० लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरून २०० किलो गांजा जप्त, आठ संशयित ताब्यात - Hemp seized pune nashik highway
तीन चारचाकी वाहनांमध्ये २०० किलो गांजा विक्रीसाठी घेऊन जात असताना हस्तगत करण्यात आला आहे. चेहेडी जकात नाक्यावर युनिट एक या पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी आठ संशयित ताब्यात घेण्यात आले आहे. तर, या गांजाची किंमत २० लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे.
नाशिक पुणे- महामार्गावरील चेहेडी जकात नाक्यावर सापळा रचून दोन स्विफ्ट डिझायर आणि इर्टिगा कारमधून विक्रीसाठी नेला जाणारा अवैध गांजा पकडण्यात युनिट एकच्या पोलिसांना यश आले आहे. आंध्रप्रदेशमधून अहमदनगर मार्गे नाशिकला काही गाड्यांमधून गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती समजताच सापळा रचत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तीन चारचाकी वाहनांमधून गोण्यांमध्ये भरलेला तब्बल दोनशे किलो गांजा आढळला. या कारवाईत आठ संशयित ताब्यात घेण्यात आले. ते नाशिक शहरातील आडगाव भागातील रहिवासी असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत.